तयारी विधानसभेची.. मंत्रिमंडळात खांदेपालट, संसदीय कार्यमंत्रिपदी विनोद तावडे

तयारी विधानसभेची.. मंत्रिमंडळात खांदेपालट, संसदीय कार्यमंत्रिपदी विनोद तावडे

सत्ताधारी भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मंत्रिमंडळात खांदेपालटाची अर्थात विस्ताराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 7 जून- सत्ताधारी भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मंत्रिमंडळात खांदेपालटाची अर्थात विस्ताराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पुण्याच्या पालकमंत्र्यांचा कार्यभार चंद्रकांत पाटील तर जळगावचा गिरीश महाजन यांना देण्यात आला आहे. गिरीश बापट यांचे अन्न आणि नागरी पुरवठा खातं जयकुमार रावल यांना तर संसदीय कार्यमंत्रिपद विनोद तावडे यांना देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.याबाबत थोड्याच वेळात घोषणा करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी केली हायकमांडशी चर्चा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश आणि मंत्रिमंडळात वर्णी याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतच विजयसिंह मोहिते पाटील यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. या दोन्ही नेत्यांनी लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपची वाट धरली. राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले.त्याचरोबर विजयसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री मदन येरावार यांनाही कॅबिनेटपदी बढती मिळण्याची शक्यता आहे.राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. विखे पाटील यांच्याकडे कोणते खाते दिले जाणार हे मात्र कळू शकलेले नाही.

विधानसभा निवडणुकीतही पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धक्का देत भाजपला चांगल्या जागा मिळवून देण्याचं फडणवीस यांचं लक्ष्य आहे. यासाठीच सोलापूरमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांना भाजपकडून ताकद देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी विजयसिंह मोहिते पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीची गुंडगिरी; सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण

First published: June 7, 2019, 3:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या