VIDEO: 'राजकारण माझा पिंड नाही'; उदयनराजे भोसलेंची अर्ज भरण्यापूर्वी पहिली प्रतिक्रिया

VIDEO: 'राजकारण माझा पिंड नाही'; उदयनराजे भोसलेंची अर्ज भरण्यापूर्वी पहिली प्रतिक्रिया

साताऱ्यातून आज भाजपकडून विधासभेसाठी शिवेंद्रराजे तर लोकसभेसाठी उदयनराजे भोसले दाखल करणार अर्ज

  • Share this:

सातारा, 01 ऑक्टोबर: साताऱ्यामध्ये आज दोन्ही राजे एकत्रित उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत येत्या विधानसभा निवडणुकीसाठी साताऱ्या मधून शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि सातारा लोकसभा पोट निवडणुकीसाठी उदयनराजे भोसले हे आपापले अर्ज शक्तिप्रदर्शन करत दाखल करणार आहेत. या दोन्ही राजांमधला वाद संपूर्ण महाराष्ट्राने यापूर्वी पाहिला आहे मात्र दोन्ही राजे आता भाजपमध्ये आल्यामुळे दोघांनीही एकत्रित उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला.

काही दिवसांपूर्वी शिवेंद्रराजेंपाठोपाठ उदयनराजे भोसलेंनीही घड्याळाची साथ सोडून कमळ हाती घेतलं आहे. विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज भरणार आहेत.

मंगळवारी सकाळी 10 वाजता गांधी मैदान, राजवाडा येथून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जाताना ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ होईल. त्यावेळी उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शेखर चरेगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, विनीत कुबेर तसेच पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद, सदस्य पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत आदींसह स्थानिक स्वराज संस्था, सहकारी संस्था यांचे सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर उदयनराजेंविरोधात लढण्यासाठी अचानक पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव समोर आले. पण ही निवडणूक लढवण्यास पृथ्वीराज चव्हाण फारसे उत्सुक दिसत नाही आहेत. मात्र, आता त्यांना सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या तयारी करण्याचे आदेश हायकमांडने दिले आहेत.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या तयारी करण्याचे आदेश हायकमांडने दिले आहेत. त्यामुळे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण असाच सामना साताऱ्यात रंगणार आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नसणार हे आता स्पष्ट झाले आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 1, 2019, 11:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading