SPECIAL REPORT: आघाडीचा साताऱ्यातील उमेदवार ठरला? उदयनराजेंना अशी देणार टफ फाईट!

उदयनराजेंना धोबीपछाड देण्यासाठी आघाडीकडून कडवं आव्हान

News18 Lokmat | Updated On: Sep 26, 2019 11:30 AM IST

SPECIAL REPORT: आघाडीचा साताऱ्यातील उमेदवार ठरला? उदयनराजेंना अशी देणार टफ फाईट!

सातारा, 26 सप्टेंबर:सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंना आव्हान देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मैदानात उतरलं जाणारय. उदयनराजेंचा पराभव करायचा असेल तर तोडीसतोड उमेदवार देण्याची काँग्रेस राष्ट्रवादीची रणनिती आहे. खासदारकीचा राजीनामा देत छत्रपती उदयनराजे भोसलेंनी भाजपची वाट धरलेल्या उदयनराजेंना धोबीपछाड देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीनं तगडा उमेदवार मैदानात उतरवाचं ठरवलंय. साताऱ्यात उदनयराजेंविरोधात तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना मैदानात उतरवलं जाणार हे आता जवळपास निश्चित झालंय.

विधानसभेसोबत होणाऱ्या लोकसभेच्या पोटनिवडणूकीत उदयनराजे भोसलेंचा पराभव करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं कंबर कसलीय. शरद पवारांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत उदयनराजेंना कडवं आव्हान निर्माण केलंय. साताऱ्याच्या मैदानात शरद पवार उतरणार असतील तर आपण माघार घेवु असं सांगत उदयनराजेंना अश्रू अनावर झाले पण त्याचवेळी इतरांशी लढायला कधीही तयार आहे हे सांगायला उदयनराजे विसरले नाहीत.

कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देणाऱ्या सातारा लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेला आत्तापर्यंत केवळ तीनचवेळा विजय मिळवता आलेला आहे. कारण जिल्ह्यात पसरलेलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं तगडं नेटवर्क. पण गेल्या काही दिवसात काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून सातारा जिल्ह्यातच सर्वात जास्त आऊटगोईंग झालंय. त्यात छत्रपतींचे वंशज असलेल्या उदयराजेंसारख्या मातब्बर नेत्यांनं भाजपचं कमळ हाती धरल्यानं जिल्ह्यात भाजपची ताकद वाढलीय. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध उदयराजे अशी तुल्यबळ लढत होणार आहे. कारण या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं एकमेकांचे हिशेब चुकते करण्याबरोबरच जिल्ह्याच्या राजकारणातली वर्चस्वाची लढाईसुद्धा लढली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 11:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...