SPECIAL REPORT : सत्तेच्या संग्रामात संपादकांचा 'सामना'

SPECIAL REPORT : सत्तेच्या संग्रामात संपादकांचा 'सामना'

मुख्यमंत्रिपदासह सत्तेच्या समसमान वाट्यासाठी पेटून उठलेल्या शिवसेना आणि संजय राऊतांना तरुण भारतनं चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 04 नोव्हेंबर : सामनाचे संपादक संजय राऊत यांना नागपूर तरुण भारतच्या अग्रलेखातून दणका देण्यात आला. संजय राऊतांची जोरदार खिल्ली उडवत महायुतीच्या सरकारमध्ये राऊत आडकाठी ठरत असल्याची टीका करण्यात आली.

मुख्यमंत्रिपदासह सत्तेच्या समसमान वाट्यासाठी पेटून उठलेल्या शिवसेना आणि संजय राऊतांना तरुण भारतनं चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. राज्यात दोन तृतीयांश शेतकरी नैसर्गिक आपत्तीने पीडित असताना, आणि त्यांचे दुःख, वेदना अहंकाराच्या गर्तेत अडकत असताना महाराष्ट्रही तितकाच हवालदिल होतोय. यासाठी महाराष्ट्र शिवसेनेला कधीही माफ करणार नाही, हे ही तितकंच जळजळीत वास्तव आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आपली हयात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीत महाराष्ट्राची सुटका करण्यासाठी घालवली. हा बेताल मात्र, त्याच बाळासाहेबांच्या संपूर्ण आयुष्याचा संघर्ष धुळीस मिळवण्याच्या मागे लागला आहे. या एका 'बेताला'च्या मागे संपूर्ण शिवसेना फरफटत जात असेल तर त्याहून दुसरे दुर्दैव कोणते म्हणता येईल? माध्यमांमध्ये फडणवीसांच्या एकाकीपणाबाबत कितीही बातम्या पेरल्या, तरी त्यातून महाराष्ट्राचे निखळ मनोरंजन होण्यापलीकडे काहीही होणार नाही. अर्थात 'विदूषक' म्हणून आपल्याकडून हेच अपेक्षित आहे. संजयनं दृष्टी देण्याचं काम केलं पाहिजे. पण संजय धृतराष्ट्र होणार असेल तर शिवसेनेच्या भवितव्यासाठी महाराष्ट्रानं चिंतीत होणं स्वाभाविक आहे. 'बेताल' जर खांद्यावरून उतरला नाही, तर सिंहासन बत्तीशीच्या कथाच तेवढ्या शिल्लक राहतील. अर्थात, ज्या फांदीवर बसलो आहोत, ती कापणार्‍याला लाकुडतोड्या नाही तर 'शेखचिल्ली' म्हणतात, याचं भान शिवसेनेला असेलच. ​​

सत्तेसाठी शिवसेना काँग्रेस आघाडीलाही जवळ करत असल्यानं तरुण भारतनं शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्त्वाचं बाळकडूही संजय राऊतांना पाजलं.

तरुण भारतमधून सोडलेल्या बाणानं शिवसेनेच्या मर्मावर घाव केला. मात्र, संजय राऊतांनी आपण त्या गावचे नसल्याचाच आव आणला. राऊतांच्या वक्तव्यही गजानन निमदेव यांनी उडवून लावलं.

शिवसेना भाजपमधला सत्तासंघर्ष शिगेला पोहोचलेला असतानाच तरुण भारतच्या अग्रलेखामुळे दोन्ही पक्ष त्यांचा हट्ट सोडायला तयार नसल्याचं स्पष्ट होतंय. त्यातच तरूण भारत मंगळवारी पुन्हा एकदा अग्रलेखातून संजय राऊतांचा रोखठोक समाचार घेणार असल्यानं, हा सत्तासंघर्ष तीव्र होणार, हे नक्की.

========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2019 11:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading