Elec-widget

SPECIAL REPORT : नेत्यांच्या जिल्ह्यात शिलेदारांनीच बदलले झेंडे, कोण गाठणार विधानसभा?

SPECIAL REPORT : नेत्यांच्या जिल्ह्यात शिलेदारांनीच बदलले झेंडे, कोण गाठणार विधानसभा?

विखे विरुद्ध थोरात हा पारंपरिक राजकीय संघर्ष आणि रोहित पवारांच्या उमेदवारीमुळं नगर जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघालं आहे.

  • Share this:

साहेबराव कोकणे, प्रतिनिधी

अहमदनगर, 11 ऑक्टोबर : नेत्यांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण अक्षरश: ढवळून निघालंय. विखे- पिचड आणि कांबळेंच्या पक्षांतरामुळं जिल्ह्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून गेले आहेत. त्यामुळं जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

विखे विरुद्ध थोरात हा पारंपरिक राजकीय संघर्ष आणि रोहित पवारांच्या उमेदवारीमुळं नगर जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघालंय. लोकसभा निवडणुकीनंतर राधाकृष्ण विखे आणि मधुकर पिचडांनी भाजपचं कमळ हाती घेतलं. त्यामुळं दोन्ही काँग्रेसला जिल्ह्यात जोरदार धक्का बसला. काँग्रेसनं डॅमेजकंट्रोल करण्यासाठी विखेंचे पारंपरिक राजकीय विरोधक बाळासाहेब थोरातांच्या गळ्यात थेट प्रदेशाध्यक्षपदाची माळ घातली.

मात्र, थोरातांचा स्वत:च्या मतदारसंघाबाहेर फारसा प्रभाव नाही. इकडं कर्जत-जामखेड मतदारसंघात पालकमंत्री राम शिंदे यांच्या विरोधात शरद पवारांचे नातू रोहित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यामुळे अवघ्या राज्याचं लक्ष या लढतीकडं लागलं आहे.

गेल्या काही वर्षांपासून रोहित पवार या मतदारसंघात सक्रीय असल्यामुळं ही लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे.

Loading...

खरं तर 2014 मध्ये जिल्ह्यातील विधानसभेच्या 12 जागांपैकी 5 आमदार भाजपचे तर एक शिवसेनेचा आमदार निवडून आला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं प्रत्येकी तीन जागांवर विजय मिळवला होता. यावेळी परिस्थिती बदलली आहे. राधाकृष्ण विखेंनी भाजपात प्रवेश केला. भाऊसाहेब कांबळेंनी काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलंय. तर राष्ट्रवादीचे पिचड भाजपात दाखल झाले आहेत. गेल्या निवडणुकीत बबनराव पाचपुतेंना धुळ चारणारे श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी ऐनवेळी निवडणुकीचं मैदान सोडलंय.

विखे आणि पिचडांच्या भाजप प्रवेशामुळं जिल्ह्यात भाजपचं बळ वाढलं असलं तरी पक्षांतर्गत गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकीकडं नेत्यांच्या गळतीमुळं दोन्ही काँग्रेसला नव्यानं सुरुवात करायची आहे. तर दुसरीकडं युतीसमोर गटबाजी रोखण्याचं आव्हान आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 06:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...