SPECIAL REPORT : 'पवार तुम्ही मला ओळखलंच नाही' म्हणणं चंद्रकांत पाटलांना पडलं मजबूत भारी!

SPECIAL REPORT : 'पवार तुम्ही मला ओळखलंच नाही' म्हणणं चंद्रकांत पाटलांना पडलं मजबूत भारी!

सिंह आला पण गड गेला...असंच म्हणावं लागेल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि सरकारमधले नंबर दोनचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबतीत

  • Share this:

कोल्हापूर, 26 ऑक्टोबर : सिंह आला पण गड गेला...असंच म्हणावं लागेल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि सरकारमधले नंबर दोनचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबतीत. चंद्रकांत पाटलांनी पुण्यातल्या कोथरूडची लढाई तर जिंकली. पण आपल्या घरच्या मैदानात कोल्हापुरात मात्र त्यांना भाजपला एकही जागा जिंकून देता आली नाही. विशेष म्हणजे, शरद पवारांना दिलेला इशारा पाटील यांच्याच अंगलट आला आहे.

पुण्यातील कोथरूडमध्ये विजय साजरा करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्या स्वत:च्या जिल्ह्यात मात्र धक्का बसला. कोल्हापुरात आघाडीच्या उमेदवारांनी भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांचा धुव्वा उडवला. सेनेला सहापैकी केवळ एकच जागा वाचवता आली.

भाजपचे चाणक्य अशी ओळख असलेल्या आणि राज्याच्या राजकारणात वेळोवेळी आपलं वजन दाखवलेल्या चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरात मात्र पक्षाला एक जागा जिंकून देता आली नाही.

गेल्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात सेनेचे सहा आणि भाजपचे दोन आमदार निवडून आले होते. तर दोन जागा राष्ट्रवादीनं जिंकल्या होत्या. काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. यावेळी काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारत जिल्ह्यात तब्बल 4 जागा जिंकल्यात. तर राष्ट्रवादीने दोन जागा जिंकल्या. जनसुराज्य आणि शिवसेना यांना प्रत्येकी एका जागी विजय मिळवता आली. पहिल्यांदाच अपक्षांनी 2 जागांवर बाजी मारली.

अलीकडेच काँग्रेसला रामराम केलेल्या प्रकाश आवाडेंनी इचलकरंजीत अपक्ष लढून भाजपच्या सुरेश हळवणरांना चीतपट केलं. तर शिरोळमध्ये अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी लढत जिंकली.

जिल्ह्यात चंद्रकांत पाटलांसारखा हेवीवेट मंत्री असतानाही भाजपला खातंही खोलता आलं नाही. आघाडीनं आपला बालेकिल्ला परत काबीज करून चंद्रकांतदादांना मोठा धक्का दिला.

सहकाराचं मजबूत जाळं असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातून काँग्रेस-राष्ट्रवादीला संपवण्याचं भाजपचं स्वप्न भंगलं आहे.

===============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 07:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading