SPECIAL REPORT : 'मला मुछ नाही, तुला तर कुछच नाही'; मिशीवर सेना उमेदवार भडकला!

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी 'मूछें हो तो...'म्हणत मिशीला जसं महत्त्व दिलं. त्याच प्रकारे खेड विधानसभा मतदारसंघात मिशी चर्चेत आली.

News18 Lokmat | Updated On: Oct 14, 2019 11:25 PM IST

SPECIAL REPORT : 'मला मुछ नाही, तुला तर कुछच नाही'; मिशीवर सेना उमेदवार भडकला!

रायचंद शिंदे, प्रतिनिधी

खेड-आळंदी, 14 ऑक्टोबर : निवडणुकीच्या प्रचारात नेते कोणत्या मुद्यावरून प्रचार करतील याचा नेम नाही. राज्यातल्या एका मतदारसंघात विकासापेक्षा मिशी महत्त्वाची झाली. मिशीवरून तिथले उमेदवार एकमेकांना पिळ देताना दिसत आहेत.

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी 'मूछें हो तो...'म्हणत मिशीला जसं महत्त्व दिलं. त्याच प्रकारे खेड विधानसभा मतदारसंघात मिशी चर्चेत आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला, 'मुछ नहीं तो कुछ नहीं' असा टोला लगावला.

दिलीप मोहिते यांचा हा निवडणुकीतला डायलॉग ऐकून गोलमाल सिनेमातला सिन लगेच डोळ्यासमोर येतो.

दिलीप मोहिते यांनी शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सुरेश गोरे यांना मिशीवरून पिळ दिला. नेहमी क्लिनशेव्ह असणाऱ्या सुरेश गोरे यांनीही मोहितेंच्या डायलॉगची जबरदस्त परतफेड केली.

Loading...

दोन मुख्य उमेदवार मिशीवरून खणाखणी करत असल्यानं इतर उमेदवार आणि नेत्यांनाही याची दखल घ्यावी लागली.

अमिताभ बच्चन आणि अमोल पालेकर यांच्या सिनेमातल्या मिशीच्या दृश्यांनी सर्वांचं मनोरंजन केलं. आता निवडणुकीच्या आखाड्यातली मिशीही चांगलंच राजकीय मनोरंजन करू लागलीय, असंच म्हणावं लागेल.

====================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2019 11:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...