SPECIAL REPORT : शिवसैनिकांचीच मेगाबंडखोरी, जागा न देणाऱ्या भाजपला पडणार महागात?

SPECIAL REPORT : शिवसैनिकांचीच मेगाबंडखोरी, जागा न देणाऱ्या भाजपला पडणार महागात?

शिवसेनेकडे असलेल्या चांदवडच्या जागेच्या बदल्यात पश्चिमच्या जागेची मागणी स्थानिक सेना पदाधिकाऱ्यांनी केली होती. पण भाजपनं त्याला नकार दिल्यामुळं शिवसेनेत बंड उफाळून आलं आहे.

  • Share this:

प्रशांत बाग, प्रतिनिधी

नाशिक, 15 ऑक्टोबर : नाशिक महापालिकेत एकहाती सत्ती मिळवल्यानंतर विधानसभेच्या चारही जागा जिंकण्याच्या भाजपच्या मनसुब्याला स्थानिक शिवसैनिकांनी सुरुंग लावला. नाशिकमधील सर्व सेनेच्या ३६ नगरसेवकांनी राजीनामा देत बंडखोराला पाठिबा जाहीर केला.

नाशिक शहरातील शिवसेनेतील बंडखोरीनं आता वेगळ वळण घेतलं आहे. निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना शहरातील शिवसेनेच्या सर्व ३६ नगरसेवकांनी सेनेला जय महाराष्ट्र करीत बंडखोर उमेदवार विलास शिंदेंना उघड पाठिंबा दिला. पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सेनेचे नगरसेवक विलास शिंदेंनी भाजप उमेदवार सीमा हिरेंच्या विरोधात बंडाचं निशान फडकवलं आहे. त्यामुळे भाजपची चांगलीचं कोंडी झाली आहे.

शिवसेनेकडे असलेल्या चांदवडच्या जागेच्या बदल्यात पश्चिमच्या जागेची मागणी स्थानिक सेना पदाधिकाऱ्यांनी केली होती. पण भाजपनं त्याला नकार दिल्यामुळं शिवसेनेत बंड उफाळून आलं आहे.

भलेही नाशिक महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता असली तरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे २२ नगरसेवक आहेत.

विशेष, म्हणजे सेनेच्या सर्व नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांऐवजी संपर्क प्रमुखांकडे राजीनामा देण्याची खबरदारी घेतली आहे. त्यामुळे हे खरंच बंड आहे की, त्याला कुणाचा आशीर्वाद आहे? अशी चर्चा रंगली आहे. पण ही बंडखोरी भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

कारण, इथं सेनेच्या बंडखोरीसोबतच मनसेचे दिलीप दातीरही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे भाजप, शिवसेना बंडखोर आणि मनसे अशी युतीच्या मतांची विभागणी होणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं नाशकातील राजकीय समीकरणं वेगानं बदलतं आहेत. नुकतेच सेना नेते संजय राऊतांनी भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या बाळासाहेब सानपांची निवडणुकीच्या धामधुमीत भेट घेतली. त्यामुळं चर्चेला उधाण आलं होतं. खरंतर भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांनी सेनेची बंडखोरी रोखण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आलं नाही. पण ऐनवेळी राजकीय धक्के देण्यात त्यांचा हातखंडा आहे.

त्यामुळं नाशिकच्या वर्चस्वाची ही लढाई भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.

=================================

Published by: sachin Salve
First published: October 15, 2019, 6:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading