निकालानंतरच्या गोंधळावर शरद पवारांचं आक्रमक भाष्य, म्हणाले...

सत्तास्थापनेचा तिढा सुटेना, शरद पवारांनी भाजप-शिवसेनेला सुनावले खडे बोल.

News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2019 11:02 AM IST

निकालानंतरच्या गोंधळावर शरद पवारांचं आक्रमक भाष्य, म्हणाले...

विनया देशपांडे, मुंबई, 02 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुतीला चांगलंच फैलावर घेतलं आहे. सत्तास्थापनेसाठी चालवलेला पोरखेळ त्वरित थांबवा असा टोला शरद पवारांनी लगावला. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.

महायुतीला राज्यात सर्वाधिक जागा मिळालेल्या असतानाही शिवसेना भाजपमध्ये सत्तास्थापन्यावरून तिढा निर्माण झाला आहे. निकालात बहुमत मिळूनही दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं, याचा निकाल लावता आलेला नाही. त्यामुळे शरद पवारांनी दोन्ही पक्षांनी खडे बोल सुनावले. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत, राज्यातल्या जनतेनं शिवसेना-भाजप युतीला जनादेश दिला आहे. त्यानुसार दोन्ही पक्षांनी तात्काळ सरकार स्थापन करावं.

शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्तास्थापनेसाठी चालवलेला पोरखेळ त्वरित थांबवावा असा टोला शरद पवारांनी लगावला. न्यूज18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी शिवसेना किंवा भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा नऊ ताखेला निकाल अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व जातीधर्माच्या नागरिकांमध्ये सलोख्याचं वातावरण राहिल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं पवारांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 10:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...