राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक, शरद पवार घेणार मोठा निर्णय?

राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक, शरद पवार घेणार मोठा निर्णय?

पुण्यात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची दुपारी 4 वाजता बैठक होणार आहे.

  • Share this:

पुणे, 17 नोव्हेंबर : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याचं वृत्त आहे. त्यानंतर आता शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे.

पुण्यात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची दुपारी 4 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील हे हजर राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांसोबत सरकार स्थापन करण्याबद्दल बैठका पार पडल्या. त्यानंतर राष्ट्रवादीची उद्या स्वतंत्र बैठक होत आहे.

शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्यापूर्वी किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्याचा आग्रह दोन्ही काँग्रेसनं धरला होता. त्यासाठी खास दिल्लीहून काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल आणि मल्लिकार्जून खरगे मुंबईत आले होते. त्यानंतर या नव्या राजकीय समीकरणाला वेग आला. मुंबईत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून बैठकांचं सत्र सुरू होतं. या बैठकीमध्ये सरकार स्थापन झाल्यावर समसमान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला.

तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी या मसुद्याबद्दल समाधान व्यक्त केलं होतं. त्यानंतर हा मसुदा तिन्ही पक्षांच्या प्रमुखांकडे पाठवण्यात येईल आणि त्यावर अखेर शिक्कामोर्तब होईल, असं सांगण्यात आलं.

Loading...

शरद पवार-सोनिया गांधींची बैठक रद्द

दरम्यान, रविवारी नवी दिल्लीत शरद पवार आणि सोनिया गांधी यांची महत्त्वाची बैठक होणार असं सांगण्यात आलं होतं. परंतु, ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचं वृत्त आहे. किमान समान कार्यक्रमावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केल्यानंतरच सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नव्या आघाडीची गाडी पुढे जाणार आहे. परंतु, अजूनही राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून काही विषयांवर चर्चा होणे अपेक्षित असल्यामुळे बैठकांचं सत्र सुरूच आहे.

================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2019 07:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...