SPECIAL REPORT : फडणवीस म्हणाले होते 'मी पुन्हा येईन', आता शरद पवार-राऊत म्हणतात...

SPECIAL REPORT : फडणवीस म्हणाले होते 'मी पुन्हा येईन', आता शरद पवार-राऊत म्हणतात...

'मी पुन्हा येईन' या देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावरुन चांगलाचं राजकीय कलगीतुरा रंगला आहे.

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर : 'मी पुन्हा येईन' या देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावरुन चांगलाचं राजकीय कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सेनेचे खासदार संजय राऊतांनी यावर मिश्कील टीका केली आहे.

विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांचं 'मी पुन्हा येईन' हे वाक्य चांगलचं गाजलं होतं. सोशल मीडियावरही त्याची चर्चा रंगली होती. राज्यात पुन्हा सत्तेवर येण्याचा आत्मविश्वास फडणवीसांनी निवडणूक प्रचारात व्यक्त केला होता. मात्र, संख्याबळा अभावी भाजपला सत्तास्थापनेच्या शर्यतीतून माघार घ्यावी लागली.

त्यामुळेच आता विरोधकांनाही फडणवीसांच्या त्या दाव्याची खिल्ली उडण्यास सुरूवात केली. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी याच वक्तव्यावरुन फडणवीसांना टोला लगावला.

मुख्यमंत्री पदावरुन बिनसल्यामुळं आता शिवसेनाही यात मागे नाही. 'मी पुन्हा येईन' या फडणवीसांच्या वक्तव्यावर सेना नेते संजय राऊतांनीही टीका केली.

भाजपशी काडीमोड घेत शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीनं सरकार स्थापनेसाठी कसरत सुरू केली. त्यामुळं आगामी काळात सत्तास्थापनेवरुन या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.

'मुख्यमंत्री भाजपचाच होईल'

दरम्यान, राज्यात महाशिवआघाडी सरकार स्थापनेसाठी आटापिटा करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री भाजपचाच होणार असं भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी दावा केला आहे.

ज्यांच्याकडे 119 चा आकडा आहे तेच राज्यात सरकार स्थापनेचा दावा करतील, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यामुळे भाजपकडे 119 चं संख्याबळ असल्याचा दावा चंद्रकांत पाटलांनी केला. पाटील यांच्या दाव्यानंतर भाजप 26 आमदारांची जुवळाजुवळ कशी करणार हा सवाल उपस्थित केला जात आहे. तसंच राज्यात कडबोळं सरकार टिकणार नाही, अशा शब्दात त्यांनी महाशिवआघाडीवर निशाणा साधलाय.

==========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2019 07:41 PM IST

ताज्या बातम्या