पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादीचं कौतुक, राजू शेट्टींनी दिला पवारांना 'हा' सल्ला!

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादीचं कौतुक, राजू शेट्टींनी दिला पवारांना 'हा' सल्ला!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजपसोबत आलेल्या अनुभवावरून राष्ट्रवादीला का सल्ला दिला असावा यावरून चर्चा रंगली आहे.

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर : राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. तर दुसरीकडे महाशिवआघाडी सरकार स्थापन करण्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुगली टाकली आहे.तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजपच्या मोहजाळ्यात फसू नका, असा सल्ला राष्ट्रवादीला दिला आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं होतं. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीचं कौतुक केल्यामुळे राजकीय चर्चांना ऊत आला आहे. स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी टीव्ट करून राष्ट्रवादीला सल्ला दिला. राजू शेट्टी म्हणतात की, 'राष्ट्रवादीने भाजपच्या मोहजाळात फसू नये. सर्वसामान्य जनतेला ते कदापि मान्य होणार नाही.' राजू शेट्टी यांच्या या टीव्टमुळे एकच खळबळ उडाली आहे. भाजपकडून राष्ट्रवादीला काही ऑफर, आमिष दिलं जात आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सोनिया गांधींच्या भेटीनंतर पवारांनी वाढवला सस्पेन्स

दरम्यान, सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी समसमान कार्यक्रमाचा मसुदा आणि आघाडी सेनेच्या नेत्यांची झालेली चर्चा ही आमदार स्तरावर झाली होती. सोनिया गांधींसोबत या बैठकीत सत्ता स्थापनेवर कोणताही निर्णय झाला नसल्याचंही पवारांनी सांगितलं. तसंच या बैठकीमध्ये शिवसेनेसंबंधी कोणतीही चर्चा झाली नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते मसुदा तयार झाला आणि तो वरिष्ठ नेत्यांना दिला ते यावर निर्णय घेतील असं सांगत आहे, तर दुसरीकडे शरद पवारांनी असा कोणताही निर्णय झाला नाही, असं म्हणत आहे. त्यामुळे महाशिवआघाडीत संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.

मोदींकडून राष्ट्रवादीचे कौतुक

आज सकाळी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात बोलताना पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीचं कौतुक केलं. राष्ट्रवादीने अशी भूमिका घेतली होती की विरोध करत असताना कधीही सभागृहाच्या 'वेल'मध्ये उतरणार नाही. अशीच भूमिका भाजपनेही घेतली होती आणि मला सांगताना आनंद वाटतो की राष्ट्रवादीने अनेक कठीण प्रसंगातही या भूमिकेचं पालन केलं. भाजपनेही हा नियम पाळला आणि हे करत असताना त्याचा कुठलाही राजकीय तोटा राष्ट्रवादी आणि भाजपलाही झाला नाही. महाराष्ट्रातल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचं कौतुक करण्याला वेगळं महत्त्व असून भाजपचं हे नवं महाराष्ट्र कनेक्शन आहे का याची चर्चा सुरू झाली आहे.

=============================

Published by: sachin Salve
First published: November 18, 2019, 7:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading