SPECIAL REPORT : 'वंचित'चा एकही उमेदवार 'का' निवडून आला नाही?

SPECIAL REPORT : 'वंचित'चा एकही उमेदवार 'का' निवडून आला नाही?

वंचितला विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. मात्र, राज्यातली आपली ताकद दाखवून देण्यात वंचितला यश आलं.

  • Share this:

मुंबई, 25 ऑक्टोबर : वंचित बहुजन आघाडीनं सोबत कोणताही पक्ष नसताना विधानसभा निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का दिला. त्यामुळे आगामी काळात वंचितची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला तब्बल 42 लाख मतं मिळाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित कशी कामगिरी बजावणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. वंचितला विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. मात्र, राज्यातली आपली ताकद दाखवून देण्यात वंचितला यश आलं.

साधारण 12 मतदारसंघांत वंचितचे उमेदवार 15व्या फेरीपर्यंत आघाडीवर होते. 288 पैकी साधारण 55 मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मोठी लढत दिली. मूर्तिजापूरमध्ये प्रतिभा अवचार यांनी अतिशय चांगली टक्कर दिली. त्यांना 57613 मतं मिळाली अवघ्या 1010 मतांनी अवचार पराभूत झाल्या.

अकोला पूर्व मतदारसंघात हरिदास भदे यांचा केवळ 2440 मतांनी पराभव झाला. अकोट मतदारसंघात अ‍ॅड. संतोष रहाटे यांनी 30040 मतं घेऊन चांगली टक्कर दिली. बाळापूरमध्ये धैर्यवर्धन फुंडकर यांनी 50 हजारांहून अधिक मते घेतली.

बुलडाणा मतदारसंघात विजय शिंदे यांनी 41 हजार मतं घेतली. कळमनुरी मतदारसंघात अजित मगर यांनी 66 हजारांहून अधिक मतं घेऊन शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांना दमवलं. लोहा मतदारसंघात शिवकुमार नरगळे यांनी 34686 मतं घेतली.

एकंदरीतच वंचितची वाटचाल आगामी काळात दमदार होणार हे स्पष्ट झालंय.

वंचित बहुजन आघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला जोरदार फटका बसला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी याची कबुली दिली.

विधानसभा निवडणुकीत वंचितनं ताकद दाखवून दिली. त्यामुळे आता आघाडीला वंचितकडे मैत्रीचा हात पुढे करावा लागणार आहे. पण, त्यासाठी आघाडी पुढाकार घेणार का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

==============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2019 10:14 PM IST

ताज्या बातम्या