मुंबई, 14 सप्टेंबर: मुंबईतील एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मां आता खाकी ऐवजी खादीत दिसणा आहेत. कारण शुक्रवारी 13 सप्टेंबर रोजी प्रदीप शर्मांनी हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. शर्मांना नालासोपाऱा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. वसई विरारमधलं ठाकूर कुटुंबाचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी शिवसनेनं ही राजकीय खेळी केल्याचं म्हटलं जात आहे.