SPECIAL REPORT: विधानसभा जाहीर होताच शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

निवडणुकीच्या तोंडावर अंबरनाथमध्ये आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या विरोधात असलेली नाराजी उफाळून आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 22, 2019 07:09 AM IST

SPECIAL REPORT: विधानसभा जाहीर होताच शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

गणेश गायकवाड (प्रतिनिधी) अंबरनाथ, 22 सप्टेंबर: शिवसेनेमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इन्कमिंग जोरदार सुरू झालं आहे. तर शिवसेना-भाजप युतीचा फॉर्म्युलाही अद्याप निश्चित झाला नाही. एका बाजूला उद्धव ठाकरे आमचं सगळं ठरलं आहे. युती तर होणारच असं म्हणत असताना भाजपकडून मात्र मौन बाळगलं जात आहे. निवडणूक जाहीर झाली आणि अंबरनाथमध्ये शिवसेनेतली गटबाजी उफाळून आली. पक्षातील नाराजांनी  विद्यमान आमदाराच्या विरोधात दंड थोपाटात इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखतही दिली.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या तोंडावर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या विरोधात असलेली नाराजी उफाळून आली आहे. त्यांची आमदारकीची ही दुसरी टर्म. नगरसेवक संदीप भराडे आणि सुबोध भारत यांनी उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे. सुबोध भारत यांच्या बाजून बड्या पदाधिकाऱ्यांचा कल पाहायला मिळतो आहे. मतदारसंघात रखडलेली विकासकामं पूर्ण करण्यासाठी बदल गरजेचा असल्याचं भारत यांनी सांगितलं.

10 वर्षांत केलेल्या कामांच्या जोरावर पक्ष तिकीट देईल असा विश्वास डॉ. बालाजी किणीकर यांनी व्यक्त केला आहे.

दोन टर्म पूर्ण करणारे डॉ. बालाची किणीकर यांच्या विरोधातली नाराजी, हेच शिवसेनेसमोरचं मोठं आव्हान असणार आहे. शिवसेनेतील अंतर्गत नाराजीचा फायदा विरोधीपक्षांना होऊ शकतो. त्यामुळे ही नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे कोणता रामबाण उपाय शोधणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 07:06 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...