पंकजा मुंडेंना भोवळ, भरसभेत कोसळल्या, पहिला VIDEO

भाजपच्या नेता आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना अखेरच्या सभेत भोवळ आली आणि त्या व्यासपीठावर कोसळल्या.

News18 Lokmat | Updated On: Oct 19, 2019 06:53 PM IST

पंकजा मुंडेंना भोवळ, भरसभेत कोसळल्या, पहिला VIDEO

बीड, 19 ऑक्टोबर : भाजपच्या नेता आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना अखेरच्या सभेत भोवळ आली आणि त्या व्यासपीठावर कोसळल्या. पंकजा व्यासपीठावर कोसळल्यामुळे एकच गोंधळ उडाला. नेते आणि पदाधिकाऱ्यांनी धाव घेऊन त्यांना सावरलं आणि रुग्णालयात नेण्यात आलं.

विधानसभा निवडणुकीसाठी परळीत शेवटची प्रचार सभा घेण्यासाठी पंकजा मुंडे पोहोचल्या होत्या. परळी शहरातील रानी लक्ष्मीबाई टॉवर चौकात ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांनी 45 मिनिटं भाषण केलं होतं.

सभा संपल्यावर स्टेज वरतीच अचानक पंकजा मुंडे यांना भोवळ आली आणि व्यासपीठावर कोसळल्या. पंकजा अचानक व्यासपीठावर कोसळल्यामुळे एकच गोंधळ उडाला. महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धाव घेऊन त्यांना सावरलं. पंकजा यांना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे.

पंकजांचा धनंजय यांच्यावर गंभीर आरोप

Loading...

दरम्यान, या सभेत पंकजा यांनी धनंजय मुंडेंवर सडकून टीका केली. 'मुंडे साहेबांच्या वाईट काळात सोडून गेलात जनता कधीच माफ करणार नाही. माझ्यावर आरोप करता साहेबांना सोडून गेलेल्याना ताई भाजपात घेतात. तुम्ही साहेबांना सोडून कुणाला जावून मिळालात. मुंडे साहेबांचे सोडा तुमचे वडील पंडित अण्णा यांच्यावर काय वेळ आणली तुम्ही? राष्ट्रवादीत अगोदर पाठवलं. वार झेलण्यासाठी ते पराभूत झाल्यानंतर ज्या अण्णाचे राजकारणात लोक जोड्या सहित पाया पडत होते. मुंडे साहेबांच्या बरोबरीने समजत होते. एवढंच नाही तर गोपीनाथ मुंडे आणि पंडित अण्णा मुंडे या राम लक्ष्मणाची जोडी तुम्ही फोडली', असा थेट आरोप पंकजांनी धनंजय यांच्यावर केला.

पुढे बोलताना त्या म्हणल्या की, राष्ट्रवादीचा नायनाट करणे हे माझ्या हातूनच होणार आहे. काल माझ्या भावाने माझ्या विरुद्ध खूप घाणेरडे भाषण केले?आणि मी कितीही नाही बोलायचे म्हणले तरी मला बोलण्यास मजबूर करत आहेत. राष्ट्रवादीवाले इतके वाईट बोलतात की, माणसाने कानात गंगाजल टाकावे. सारख कालपासून भाषण करत आहेत, की ताईनी सुरेश धस पासून ते अक्षय मुंदडा पर्यंत सेटल मेंट केली, धनंजय मुंडे नेमकं तुम्हाला म्हणायचं तरी काय? असा सवाल ही पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना केला. तसंच मला एकवेळा निवडून येऊद्या मग बघू, अश्या शब्दात धनंजयना पंकजा मुंडेंनी सुनावले.

================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 06:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...