SPECIAL REPORT : एखाद्या उमेदवार मिळाले नाही 'ती' मतं मिळाली नोटाला!

SPECIAL REPORT : एखाद्या उमेदवार मिळाले नाही 'ती' मतं मिळाली नोटाला!

निवडणुकीत मतदार त्यांच्या आवडीच्या उमेदवाराला मत देतात. मात्र, अनेकदा मतदारांना एकही उमेदवार पसंत पडत नाही.

  • Share this:

मुंबई, 25 ऑक्टोबर : राज्यातले मतदार आता नोटाला चांगलीच पसंती देताना दिसत आहेत. अनेक मतदारसंघात नोटाचा मोठा प्रभाव पाहायला मिळाला. लातूर आणि पलूस कडेगाव मतदारसंघात तर दुसऱ्या क्रमांकाची मतं नोटाला मिळाली.

निवडणुकीत मतदार त्यांच्या आवडीच्या उमेदवाराला मत देतात. मात्र, अनेकदा मतदारांना एकही उमेदवार पसंत पडत नाही. त्यामुळे मतदारांना नोटाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी नोटासमोरील बटन मोठ्या प्रमाणात दाबलं.

लातूर ग्रामीण मतदारसंघात धीरज देशमुख यांच्यानंतर नोटाला सर्वाधिक मतं मिळाली. 27,500 मतदारांनी नोटाचं बटण दाबलं. लातूर ग्रामीण पाठोपाठ पलूस कडेगाव मतदारसंघात 20631 मतदारांनी नोटाला पसंती दिली. अक्कलकुवा मतदारसंघात शिवसेनेचे अमशा पाडवी दोन हजार मतांनी पराभूत झाले. तिथं 4857 मतं नोटाला पडली. ठाणे शहर मतदासंघात 5547 इतकी तिसऱ्या क्रमांकाची मतं नोटाला मिळाली. ओवळा माजीवडा मतदारसंघात चौथ्या क्रमांकाची म्हणजेच 6054 मतदारांनी नोटाला पसंती दिली. कल्याण ग्रामीण मतदारसंघात नोटाला 6092 मतं मिळाली.

मुंबईत तब्बल 1 लाख 38 हजार 277 मतदारांनी 'नोटा'चा पर्याय वापरला. जोगेश्वरी मतदारसंघात 12,031 मतदारांन नोटाला पसंती दिली. रायगड जिल्ह्यात 29,097 मतदारांनी नोटाची निवड केली. त्यात पनवेल मतदारसंघात सर्वाधिक 12371 मतदारांनी नोटाला पसंती दिली. पालघर जिल्ह्यातल्या 31300 मतदारांनी नोटाला पसंती दिली.

एकंदरीतच नोटाला पसंती देणाऱ्या मतदारांची संख्या वाढत असल्याचं स्पष्ट होतं आहे.

=============

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2019 11:30 PM IST

ताज्या बातम्या