SPECIAL REPORT : गल्लीत गोंधळ अन् दिल्लीत गडकरींची मोठी खेळी!

SPECIAL REPORT : गल्लीत गोंधळ अन् दिल्लीत गडकरींची मोठी खेळी!

सत्ता स्थापनेच्या रणांगणात नितीन गडकरी कसलेले सरदार आहेत. गोव्यात नितीन गडकरींची हातोटी देशानं पाहिली.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास,प्रतिनिधी

नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर : न्यूज 18 लोकमतनं दिल्लीत सुरू असलेली राजकीय खलबतं तमाम जनतेसमोर आणली. त्यामुळे सत्तेची समीकरणं जुळवण्यासाठी पडद्यामागे सुरू असलेल्या घडामोडी देशानं पाहिल्या. राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असतानाच काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी दिल्लीत नितीन गडकरींची भेट घेतली. मात्र याचा सुगावा लागल्यानं न्यूज 18 लोकमतची टीम आधीच तिथं पोहोचली.

दिल्लीत नितीन गडकरींच्या निवासस्थानात काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या कारनं प्रवेश केला आणि राजकीय चर्चांचा अॅक्सलेटर जोरात दाबला गेला. राज्यात सत्ता स्थापनेचा गिअर क्षणाक्षणाला बदलला जात असतानाच दोन बड्या नेत्यांमधली भेट मोठी बातमी ठरली.

महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींमध्ये काँग्रेस तटस्थ राहिल. मात्र, आघाडीच्या नेत्यांवर कारवाई होऊ नये असा निरोप अहमद पटेल यांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये गुप्त भेट होणार होती, मात्र शेवटच्या क्षणी न्यूज 18 लोकमतला त्याचा सुगावा लागला. पडद्यामागे घडणारी खलबतांचा न्यूज 18 लोकमतनं गौप्यस्फोट केला. आणि राज्यात राजकीय भूकंप झाला. त्यात नव्यानं आकारास येऊ घातलेली सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची कथित आघाडी जमीनदोस्त झाली.

काँग्रेस, एनसीपीची साथ घेऊन सत्ता स्थापन्याचं स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनाला भाजपनं या माध्यमातून दणका दिलाय. मात्र, अहमद पटेल यांनी महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा झाली नसल्याचा दावा केला असला तरी त्यांची ती मखलाशी कुणाच्याच पचनी पडणार नाही.

सत्ता स्थापनेच्या रणांगणात नितीन गडकरी कसलेले सरदार आहेत. गोव्यात नितीन गडकरींची हातोटी देशानं पाहिली.

मनोहर पर्रीकरांच्या निधनानंतर गोवा सरकार संकटात सापडलं होतं. पर्रीकरांच्या निधनानंतर तिथे छोटे पक्ष सक्रिय झाले. मगोप आणि गोवा फॉरवर्ड पार्टीत बैठकींचं सत्र सुरू झाल्यानं नितीन गडकरींवर मिशनची जबाबदारी देण्यात आली. गोव्यातली सत्ता राखण्यासाठी गडकरींनी रणनिती आखायला सुरूवात केली. गडकरींनी प्रत्येक आमदारासोबत चर्चा केली. मात्र, या काळात छोट्या पक्षांनी त्यांच्या नेत्यांचं नाव सीएमपदासाठी पुढे केलं. काँग्रेसनही सरकार बनवण्यासाठी दावा केला. अखेर भाजपच्या प्रमोद सावंतांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झालं. गडकरींनी बाजी मारून सत्ता राखली. परिणामी प्रमोद सावंतांसह अकरा मंत्र्यांनी शपथ घेतली.

एंकदरीतच गोव्यात सत्तेचा चमत्कार घडवणाऱ्या नितीन गडकरींनी आता राज्यातलं सत्तेचं समीकरण जुळवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं स्पष्ट होऊ लागलंय. नितीन गडकरींचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. उद्धव ठाकरेंशीही त्यांचा चांगला संवाद आहे. त्यामुळे शिवसेनेचे मन वळवून महायुतीच्या सरकारची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी नितीन गडकरींची मोठी भूमिका असणार हे आता स्पष्ट झालंय.

===========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2019 08:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading