• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे
  • VIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे

    News18 Lokmat | Published On: Oct 22, 2019 08:25 AM IST | Updated On: Oct 22, 2019 08:25 AM IST

    अद्वैत मेहता (प्रतिनिधी) पुणे, 22 ऑक्टोबर: पुण्यातील खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने निकालापूर्वीच विजयाचे होर्डिंग्ज झळकावलेत. सचिन दोडके आमदारपदी निवड झाल्याबद्दल वारज्यामध्ये बॅनर लावण्यात आलेत. विशेष म्हणजे लोकसभेला सुप्रिया सुळे या मतदारसंघातून पिछाडीवर होत्या. तरीही विधानसभेला राष्ट्रवादीच्या उमेदवारानं निकालाआधीच विजयाचा दावा केला. महापालिका निवडणुकीच्या निकालाआधी सुद्धा दोडकेने असेच फलक लावले होते. विशेष म्हणजे त्यावेळी पुण्यात भाजपची लाट असतानाही दोडके यांच्या प्रभागात माञ चारही राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading