SPECIAL REPORT : नारायण राणेंच्या इनिंगमुळे भाजप-सेनेत पेटणार संघर्ष?

SPECIAL REPORT : नारायण राणेंच्या इनिंगमुळे भाजप-सेनेत पेटणार संघर्ष?

राणेंच्या वाटेत सगळ्यात मोठा अडथळा होता तो शिवसेनेचा...पण, राणेंच्या प्रवेशावेळी ना राणेंनी ना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेबद्दल चकार शब्द काढला नाही.

  • Share this:

दिनेश केळुस्कर, प्रतिनिधी

सिंधुदुर्ग, 15 ऑक्टोबर : कोकणातील दिग्गज नेते नारायण राणेंनी त्यांचा स्वाभिमान पक्ष अखेर भाजपमध्ये विलीन केला. त्यांच्या या विलिनीकरणानंतर कोकणात भाजपला ताकद मिळणार आहे. पण भाजप आणि शिवसेना असा नवा संघर्ष तर निर्माण होणार नाही ना अशी चर्चाही रंगू लागली.

मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर आज नारायण राणेंचा स्वाभिमान भाजपमध्ये विलीन झाला. भाजप प्रवेशातील सगळ्या अडथळ्यांना दूर सारत राणे भाजपमध्ये दाखल झाले असले तरी हा सगळा काळ त्यांच्या संयमाची परीक्षा पाहाणारा होता. त्यांची आगतिकता त्यांनीच बोलून दाखवली.

राणेंच्या वाटेत सगळ्यात मोठा अडथळा होता तो शिवसेनेचा...पण, राणेंच्या प्रवेशावेळी ना राणेंनी ना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेबद्दल चकार शब्द काढला नाही. त्यात प्रवेशाच्या आधीच राणेंनी शिवसेनेसोबत जुळवून घेण्याची तयारी दाखवून शिवसेनेसोबतच्या संघर्षाला तुर्तास पूर्णविराम दिल्याचे संकेत दिले.

राणेंच्या मुलांचा अनावश्यक आक्रमकपणा राणेंच्या राजकीय वाटचालीत अनेकदा अडचणी वाढवणारा ठरला. त्यामुळेच आता तुम्ही भाजपमध्ये आला असून ती संस्कृती आत्मसात करावी लागेल हे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी राणे पुत्रांना कानपिचक्या दिल्या.

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव गाजवलेल्या, वादांची वादळं उठवलेल्या आणि झेललेल्या राणेंनी भाजपमध्ये प्रवेश करत नव्या टप्प्याची सुरूवात केली.

याआधी राणे 2005 मध्ये शिवसेना सोडून काँग्रेसवासी झाले. तेव्हापासून दशकभर राणे विरुद्ध शिवसेना या वादानं कोकण धगधगत राहिलंय. तरीही भाजपनं राणेंना आपलंस केल्यानं शिवसेनेची भूमिका काय याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहे.

=======================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2019 08:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading