SPECIAL REPORT : सहा महिन्याचा गोऱ्हा जुंपणार का? बैलगाडा शर्यतीसाठी अमोल कोल्हेंची बॅटिंग!

SPECIAL REPORT : सहा महिन्याचा गोऱ्हा जुंपणार का? बैलगाडा शर्यतीसाठी अमोल कोल्हेंची बॅटिंग!

बैलगाडा शर्यत कधी सुरू होणार याकडे इथल्या नागरिकांचं लक्ष लागलंय

  • Share this:

रायचंद शिंदे, प्रतिनिधी

खेड-आळंदी, 16 ऑक्टोबर : खेड तालुक्यात बैलगाडा शर्यतीच्या शौकिनांची मोठी संख्या आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही बैलगाडा शर्यतीचा मुद्दा जोरात सुरू आहे. आणि प्रचारात प्रतिस्पर्ध्यांनाही शेलक्या उपमा दिल्या जात आहेत.

खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या भाषणाच्या आधी बैलगाडा शर्यतीत जसा आवाज दिला जातो अशी आरोळी ठोकण्यात आली. त्यामुळे सभेला उपस्थित असलेल्या बैलगाडा शौकिनांमध्ये उत्साह संचारला. बैलगाडा शर्यत कधी सुरू होणार याकडे इथल्या नागरिकांचं लक्ष लागलंय. त्यामुळे अमोल कोल्हे यांनीही हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. मात्र, त्यांचं हे सांगण्याची शैली जरा हटके होती.

विधानसभा निवडणुकीत खेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत लढत होत आहे. या लढतीवर अमोल कोल्हेंनी मतदारांना विनोदी शैलीत आवाहन केलं.

खेड मतदारसंघातली निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. आता कोणत्या उमेदवाराचा बाजार उठणार हे निकालानंतर स्पष्ट होईल.

==================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 11:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading