Exit Poll Result LIVE : मराठवाड्यातही भाजप-शिवसेना 'पैलवान', आघाडीला दाखवले आस्मान?

Exit Poll Result LIVE : मराठवाड्यातही भाजप-शिवसेना 'पैलवान', आघाडीला दाखवले आस्मान?

News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत भाजप- शिवसेना महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातही भाजप आणि शिवसेनेनं आपला गड कायम राखला आहे.

  • Share this:

मुंबई, 21 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी उत्साहात मतदान पार पडलं. 288 जागांसाठी सर्व उमेदवारांचं भवितव्य आता ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालं आहे. परंतु, त्याआधी News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत भाजप- शिवसेना महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातही भाजप आणि शिवसेनेनं आपला गड कायम राखला आहे.

एक्झिट पोलनुसार, भाजप-सेना महायुतीला  48 पैकी 44 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.  भाजपला 23 तर शिवसेनेला 21 जागा मिळतील, असा अंदाज त्याआधी News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत समोर आला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला मराठवाड्यात 4 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एक्झिट पोलचा अंदाज

महायुती - 44

महाआघाडी - 4

भाजप - 23

शिवसेना - 21

काँग्रेस- 2

राष्ट्रवादी  - 2

 इतर - 00

2014 पासून भाजप शिवसेनेचा डंका

विशेष म्हणजे, मराठवाडा हा हैदराबाद संस्थानमधून वेगळा झाल्यानंतर मराठवाड्यात राजकारणाचं वेगवेगळे समीकरण तयार झाली. मुक्तीसंग्राम लढ्यात काँग्रेसचे योगदान असल्यामुळे मराठवाड्यात काँग्रेसचा वर्चस्व कायम राहिलं होतं. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही मराठवाड्यात छाप कायम राहिली. परंतु, 2014 मध्ये मोदी लाटेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पार धुव्वा उडाला. भाजप आणि शिवसेनेनं मुसंडी मारत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गडाला भगदाड पाडले. मागील निवडणुकीत भाजपने 16 तर शिवसेनेनं 11 जागा जिंकून मुसंडी मारली होती. तर राष्ट्रवादी 09 आणि काँग्रेस 09 जागा मिळाल्या होत्या.

मराठवाडा 2014 चा निकाल - एकूण जागा 48

2014 निवडणूक

शिवसेना 11

भाजप 16

एनसीपी 09

कांग्रेस 09

अपक्ष 02

एमआईएम 01

राज्यात पुन्हा देवेंद्र सरकार?

288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकालातून समोर येत आहे.

मेगाभरतीचा फटका?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात मेगाभरती सुरू झाली होती. यात उस्मानाबाद आणि बीडमधून राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला. विशेष म्हणजे, शरद पवारांचे नातेवाईक असलेले राणा जगजितसिंह यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. तर बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातावरून काढून भाजपात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.

पंकजा की धनंजय?

परळी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एक्झिट पोलनुसार, भाजपने मुसंडी मारल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

लातुरात देशमुख राखणार का 'गढी'?

लातूर हा एकेकाळी काँग्रेसचा किल्ला मानला जात होतो. परंतु, विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर काँग्रेसची मोठी वाताहत झाली. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकीत काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली. यंदाच्या निवडणुकीत आपली पकड आणण्यासाठी देशमुख कुटुंबातून अमित  आणि धीरज निवडणुकीच्या मैदानात उतरले. धीरज हे ग्रामीणमधून पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. तर अमित दुसऱ्यांदाच आपलं नशिब आजमावत आहे. परंतु, एक्झिटपोलच्या अंदाजानुसार, संपूर्ण मराठवाड्यात जर 2 जागा  मिळणार असा अंदाज असेल तर देशमुख कुटुंबासाठी चिंतेचं वातावरण निर्माण करणार आहे.

=====================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 06:51 PM IST

ताज्या बातम्या