LIVE EXIT POLL :काँग्रेसच्या 'या' 3 मोठ्या नेत्यांना हादरा, गड होणार उद्ध्वस्त?

एक्झिट पोलमध्ये महायुतीचे सरकार येणार असा अंदाज वर्तवला आहे. आता मुख्य लढतीचा विचार केला तर काँग्रेसचे 3 मोठे नेते पराभूत होण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2019 09:26 PM IST

LIVE EXIT POLL :काँग्रेसच्या 'या' 3 मोठ्या नेत्यांना हादरा, गड होणार उद्ध्वस्त?

मुंबई, 21 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपल्यानंतर आता वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोलचे अंदाज आता समोर आले आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये महायुतीचे सरकार येणार असा अंदाज वर्तवला आहे. आता मुख्य लढतीचा विचार केला तर काँग्रेसचे 3 मोठे नेते पराभूत होण्याची शक्यता आहे.

राज्यातली काँग्रेसची धुरा आपल्या हाती सांभाळणारे बाळासाहेब थोरात यांनाच सर्वात मोठा धक्का बसणार आहे. कारण, न्यूज 18 लोकमत आणि आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत थोरात पराभूत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बाळासाहेब थोरात यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण आपला गड कायम राखण्यात अपयशी ठरले आहे, असा अंदाजही समोर आलं आहे. तसंच लातूरमधून माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा मुलगा अमित देशमुख पराभूत होण्याची शक्यता आहे. अमित देशमुख हे लातूर शहरातून निवडणूक लढवत आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षच पराभूत?

लोकसभेत दारूण पराभवानंतर काँग्रेसमध्ये उदासीन वातावरण निर्माण झाले होते. राहुल गांधींनीच राजीनामा दिल्यानंतर पक्षात राजीनामास्त्र सुरू झाले होते. राज्यात अशोक चव्हाण यांनीही आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील असा सामनाच विधानसभेत रंगला होता. परंतु, इथं विखे पाटील यांनी थोरातांना आस्मान दाखवल्याचं समोर येत आहे.

Loading...

अशोक चव्हाणांच्या गडाला खिंडार?

लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडणूक लढवली. परंतु, वंचित आघाडीच्या फॅक्टरमुळे अशोक चव्हाणांना पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभेतील पराभवाची तूट भरून काढण्यासाठी अशोक चव्हाण मैदानात उतरले होते. त्यांच्याविरोधात भाजपकडून बापूसाहेब गोरठेकर यांना उमेदवारी दिली. चव्हाणांनी आपला गड कायम राखण्यासोबत पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला. परंतु, एक्झिट पोलमध्ये चव्हाणांच्या हाती पराभवच दाखवण्यात आला आहे.

एक्झिट पोलचा अंदाज 2019

महायुती - 44

महाआघाडी - 4

भाजप - 23

शिवसेना - 21

काँग्रेस- 2

राष्ट्रवादी - 2

इतर - 00

मेगाभरतीचा फटका?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात मेगाभरती सुरू झाली होती. यात उस्मानाबाद आणि बीडमधून राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला. विशेष म्हणजे, शरद पवारांचे नातेवाईक असलेले राणा जगजितसिंह यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. तर बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातावरून काढून भाजपात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.

बीडमध्ये पंकजा मुंडे मारणार बाजी?

News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत भाजप- शिवसेना महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो. या पोलनुसार पंकजा मुंडे यांचं पारडं जड असल्याचं सांगण्यात येत आहे. तर धनंजय मुंडेंचा पराभव होणार आहे. परळी मतदारसंघ सगळ्यात जास्त गाजला तो मुंडे भाऊ-बहिणींमध्ये. दोघांमध्येही कठोर टक्कर पाहायला मिळते. पण अशात धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

परळीमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा पराभव केला आणि त्या मंत्री झाल्या. आता 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

=======================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 07:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...