जळगाव, 01 ऑक्टोबर: भाजपची आज पहिली यादी जाहीर आज जाहीर झाली मात्र त्यामध्ये एकनाथ खडसेंना उमेदवारी दिली नाही. तरीही एकनाथ खडसेंनी आज जळगावमधील मुक्तीताईनगर विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. अनेक प्रलोभनं मला दाखवण्यात आली, पक्ष सोडण्यासाठी दबाव टाकण्यात आला मात्र मी 42 वर्ष पक्षासोबत प्रामाणिक राहिलो. पक्षासोबत प्रामाणिक राहाणं हा गुन्हा असेल तर तो मी केला आहे. अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली आहे.