• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुंबई काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आडमुठेपणा कायम; राहुल गांधींच्या सभेत नाराजीनाट्य
  • VIDEO : मुंबई काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आडमुठेपणा कायम; राहुल गांधींच्या सभेत नाराजीनाट्य

    News18 Lokmat | Published On: Oct 15, 2019 12:31 PM IST | Updated On: Oct 15, 2019 12:32 PM IST

    मुंबई, 15 ऑक्टोबर : मुंबई काँग्रेसमधलं नाराजीनाट्य काही केल्या संपत नाही. सोमवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींची मुंबईत प्रचारसभा झाली. या प्रचारसभेला काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि मिलिंद देवरा दोघांनीही दांडी मारली. यावर नाराजीच्या चर्चा बिनबूडाच्या असून आपण घरच्या कार्यक्रमात व्यस्त असल्यानं येऊ शकणार नाही हे आपण राहुल गांधींना आधीच सांगितलं होतं असं ट्विट निरुपम यांनी केलं. पण दोघांच्या गैरहजेरीवरुन मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी नाराजांचे कान टोचलेत. पक्षविरोधी भूमिका न घेता आणि वाद न करता सर्वांनी पक्षाचं काम करावं असं विधान गायकवाडांनी केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी