SPECIAL REPORT : भोलेनाथ फडणवीसांना पावणार का? होणार का पुन्हा मुख्यमंत्री?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं. लोकसभा निवडणुकी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अशाच प्रकारे केदारनाथाचा धावा केला होता.

News18 Lokmat | Updated On: Oct 23, 2019 08:52 PM IST

SPECIAL REPORT : भोलेनाथ फडणवीसांना पावणार का? होणार का पुन्हा मुख्यमंत्री?

केदारनाथ, 23 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं. लोकसभा निवडणुकी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अशाच प्रकारे केदारनाथाचा धावा केला होता.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी सपत्नीक केदारनाथच्या चरणी दाखल झाले. विधानसभा निवडणुकीच्या निकालाला काही तास उरले असताना फडवीसांनी भोलेनाथाचं दर्शन घेतलं. विशेष, म्हणजे आपल्या या दौऱ्याचे फोटो त्यांनी सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे.

मे महिन्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशाच प्रकारे केदारनाथाचं दर्शन घेतलं होतं.त्यांच्या या देवदर्शनाची देशभर चर्चा झाली होती. आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्र्यांनीही निवडणूक निकालापूर्वी केदारनाथाचं दर्शन घेतलंय.

गेली काही दिवस निवडणूक प्रचारात व्यस्त असलेल्या नेत्यांनी मतदानानंतर कुटुंबासोबत वेळ घालवणं पसंत केलं. तर मुख्यमंत्र्यांनी थेट केदारानाथ गाठलं.

खरंतर भाजपनं ही विधानसभेची निव़डणूक फडणवीसांच्या नेतृत्वाखाली लढवली असं नाही, तर भावी मुख्यमंत्री म्हणून पक्षानं त्यांचं प्रोजेक्ट केलं होतं. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीचं मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून वातावरण ढवळून काढलं होतं.

Loading...

आता एक्झिट पोलमध्येही भाजप-सेनेला घवघवीत यश मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. गुरुवारी निवडणूक निकाल जाहीर होणार असून त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी भोलेनाथाला कोणतं साकडं घातलं या विषयी मात्र सोशल मीडियावर चर्चा रंगली.

======================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2019 08:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...