भाजप-सेनेचा सत्तासंघर्ष संघाच्या दारी? मुख्यमंत्री फडणवीस मोहन भागवतांच्या भेटीला

मुंबईतील बैठक आटोपून मुख्यमंत्री फडणवीस थेट नागपूरला रवाना झाले. संध्याकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर इथल्या मुख्यालयात पोहोचले.

News18 Lokmat | Updated On: Nov 5, 2019 11:59 PM IST

भाजप-सेनेचा सत्तासंघर्ष संघाच्या दारी? मुख्यमंत्री फडणवीस मोहन भागवतांच्या भेटीला

नागपूर, 05 नोव्हेंबर : शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. आता सत्तेचा हा वाद सरसंघचालकांच्या दारात पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली.

मुंबईतील बैठक आटोपून मुख्यमंत्री फडणवीस थेट नागपूरला रवाना झाले. संध्याकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर इथल्या मुख्यालयात पोहोचले. यावेळी त्यांनी मोहन भागवत यांची भेट घेतली आहे.

दरम्यान, त्याआधी दिल्लीतून परत आल्यानंतर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर भाजपने मुख्यमंत्री फडणवीसच होणार हे स्पष्टपणे बजावलं आहे. तसंच सेनेला जेरीस आणण्यासाठी भाजपनं प्लॅन बी तयार केला आहे.त्यानुसार 2014 प्रमाणेच शपथविधी उरकून नंतर सेनेची कोंडी करण्याची तयारी भाजप करत असल्याचं समजतं आहे.

शपथविधीचा छोटेखानी समारंभ लवकरच होईल, असं भाजप नेते सांगत आहे. त्यासाठी काही आमदार गैरहजर राहतील यांची खबरदारी घेत विधिमंडळात बहुमताचा आकडाच खाली आणण्याचा करण्याचा डाव भाजप टाकू शकतो. चर्चेसाठी सेनेच्या प्रस्तावाची वाट बघत असल्याचं सागून भाजपनं चेंडू उद्धव ठाकरेंच्या कोर्टात टोलवला.

इकडे दररोज पत्रकार परिषदा घेऊन संजय राऊत सेनेची भूमिका आक्रमकपणे मांडत आहेत. सत्तेत समसमान वाटा, अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद हा सेनेचा हट्ट कायम आहे.

Loading...

पण सेनेच्या या आक्रमक भूमिकेला तितकंच आक्रमक उत्तर देण्याची तयारी भाजपनं केल्याचं दिसतंय. कोणत्याही परिस्थितीत सेनेला मुख्यमंत्रिपद न देण्यावर भाजप ठाम आहे. सेनाच जनमताचा अनादर करत नसल्याचा आरोप भाजपनं केला.

=========================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2019 10:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...