SPECIAL REPORT: भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा काँग्रेसला फायदा होणार?

SPECIAL REPORT: भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा काँग्रेसला फायदा होणार?

विधानसभेचं बिगुल वाजताच तिकीटासाठी रस्सीखेच तर चांदवड-देवळा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या वेगानं हालचाली सुरू

  • Share this:

बब्बू शेख (प्रतिनिधी)मनमाड, 23 सप्टेंबर:विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजताच इतर मतदारसंघाप्रमाणे चांदवड-देवळा मतदारसंघातही राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून इच्छुक उमेदवार तिकीट मिळविण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजताच चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांची धडपड सुरू झाली आहे. युतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ भाजपकडं असून डॉ.राहुल आहेर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.

मात्र या वेळी त्यांना स्वपक्षीयांच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. बाजार समितीचे सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे,जिल्हा बँकेचे सभापती केदार आहेर,माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. गेल्या 5 वर्षांत आपण मोठ्या प्रमाणात विकास कामे केली असल्याचा दावा डॉ. राहुल आहेर यांनी केला.काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपात चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहाता या मतदारसंघात राष्ट्रवादीकडे कोणी तुल्यबळ उमेदवार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा मतदारसंघ मिळावा यासाठी काँग्रेसनं जोर लावला आहे. काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

चांदवड भागात आमदार बच्चू कडू यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांची प्रहार संघटना या मतदारसंघात उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहे. मनसे आणि बहुजन वंचित आघाडीही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. प्रमुख पक्षांचे ४- 5 उमेदवार रिंगणात उतरले तरी खरी लढत ही युती आणि आघाडीच्या उमेदवार होणार असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे.

प्रांतवाद आणि दखणी-अहिराणी बोली भाषेत विभागलेला हा मतदारसंघ आहे. चांदवड आणि देवळा या दोन भागातला प्रांतवाद आजही कायम आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत हा वाद कोण्याच्या पथ्यवार पडतो त्यावर विजयाची गणितं अवलंबून असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 10:26 AM IST

ताज्या बातम्या