मुख्यमंत्रिपदाबाबत चंद्रकांत पाटलांचा खुलासा, उदयनराजेंबद्दलही दिले संकेत

मुख्यमंत्रिपदाबाबत चंद्रकांत पाटलांचा खुलासा, उदयनराजेंबद्दलही दिले संकेत

"आपल्याला काय हवं आहे ते व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. मात्र, सत्तास्थापने संदर्भातील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार..."

  • Share this:

पुणे, 26 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप जास्त जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. तर दुसरीकडे सेनेनं आक्रमक होत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. परंतु, देवेंद्र फडणवीस हेच आमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. बदलाचा प्रश्नच नाही. त्यांचं काम चांगलं आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

कोथरूड मतदारसंघामधून चंद्रकांत पाटील विजयी झाले आहे. त्यानिमित्ताने पुण्यात आज चंद्रकांत पाटील यांचा स्थानिक नगरसेवकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी बोलताना, 'भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या आमदारांची बैठक येत्या 30 तारखेला दुपारी एक वाजता विधानभवनात होईल. त्यासाठी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक उपस्थित असतील. या बैठकीत आमचा संसदीय नेता निवडला जाईल', अशी पाटील यांनी दिली.

अमित शहा बोलणार!

आपल्याला काय हवं आहे ते व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. मात्र, सत्तास्थापने संदर्भातील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना आहेत. पुढील दोन-तीन दिवसात याबाबतची बोलणी सुरू होईल. आवश्यकता भासल्यास राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी ते बोलतील,अशी माहितीही त्यांनी दिली.

उदयनराजेंना दिलासा

उदयनराजेंचा पराभव आमच्यासाठी अनपेक्षित आहे, असं असलं तरी पक्षसंघटना त्यांची योग्य ती काळजी घेईल, असं सांगत त्यांनी उदयनराजेंना दिलासा दिला आहे.

'यंदा जास्त जागा जिंकल्या'

आम्हाला गेल्या वेळेपेक्षा कमी जागा मिळाल्या असल्या तरी आम्ही यावेळी 150 जागा लढवून 106 जागा जिंकल्या.गेल्यावेळी आम्ही 260 जागा लढल्या होत्या. त्यातील 122 जिंकल्या होत्या. त्यामुळे यावेळी खूप मोठा अपयश आलं असा अजिबात नाही. आज निवडून आलेल्या 19 अपक्षांनी आम्हाला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे आमची बेरीज 125 होतच आहे, असंही पाटील यांनी सांगितलं.

===========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 06:30 PM IST

ताज्या बातम्या