SPECIAL REPORT :...म्हणून चंद्रकांत पाटलांना कोथरूडमध्ये वाट्याच्या 1 लाख साड्या!

SPECIAL REPORT :...म्हणून चंद्रकांत पाटलांना कोथरूडमध्ये वाट्याच्या 1 लाख साड्या!

पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महिला मतदारांना तब्बल 1 लाख साड्या वाटणार आहेत.

  • Share this:

वैभव सोनवणे, प्रतिनिधी

पुणे, 28 ऑक्टोबर : पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महिला मतदारांना तब्बल 1 लाख साड्या वाटणार आहेत. पण, या साडी वाटपावरून पुण्यात राजकारण रंगलं असून विरोधकांनी टीका सुरू केली आहे.

निवडणुकीत कोथरूडकरांनी निवडून दिल्याबद्दल भाऊबीज म्हणून चंद्रकांत पाटील आता कोथरूडमध्ये १ लाख साड्यांच वाटप करणार आहेत. त्यासाठी नगरसेवकांना पाटील यांच्या कार्यालयाकडे नोंदणी करण्याचे आदेश ही देण्यात आले आहे. या साड्या नगरसेवकांनी भाऊबीजेला घरपोहोच करायची जबाबदारी ही देण्यात आली आहे. त्यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर आहे तर मनसेकडून या साडीवाटपाला तीव्र विरोध करण्यात आला आहे.

पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्या मतदारसंघात तब्बल एक लाख साड्यांचं वाटप करणार आहेत. विशेष म्हणजे, मतदारसंघातील भाजपच्या नगरसेवकांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली.

चंद्रकांत पाटलांच्या या साडी वाटपाविषय़ी काही भाजप नगरसेवकांनी खासगीत नाराजीही व्यक्त केली. तर मनसेनं या साडीवाटपावर थेट अक्षेप घेतला आहे. हे साडी वाटप म्हणजे कोथरूडच्या मतदारांचा अपमान असल्याची टीका मनसेचे पराभूत उमेदवार किशोर शिंदेंनी केली.

विधानसभा निवडणूकीपासून भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोणत्या ना कोणत्या कारणातून चर्चेत आहेत. आता साडी वाटपामुळं पुन्हा एकदा कोथरुडमध्ये त्यांची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे हे १ लाख साड्यांचं वाटप कशासाठी? असा प्रश्न सर्व सामान्य पुणेकरांना पडलाय. त्यामुळे आगामी काळात या मुद्यावरुन पुणे शहरात राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2019 11:02 PM IST

ताज्या बातम्या