SPECIAL REPORT : खडसेंच्या ऐवजी त्यांच्या मुलीला तिकीट? काय आहे भाजपचा प्लॅन

SPECIAL REPORT : खडसेंच्या ऐवजी त्यांच्या मुलीला तिकीट? काय आहे भाजपचा प्लॅन

भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास एकनाथ खडसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष.

  • Share this:

इम्तियाद अहमद (प्रतिनिधी) जळगाव, 2 ऑक्टोबर: भाजपची पहिली यादी मंगळवारी दुपारी जाहीर झाली. या यादीमध्ये एकनाथ खडसेंच्या नावाचा उल्लेख नसल्यानं त्यांचा पत्त भाजपने कट केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी मुक्ताईनगरमधून मोठं शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला खरा पण भाजपच्या पहिल्या यादीत खडसेंचं नावच नाही. त्यामुळे खडसे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी मंगळवारी खडसेंच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं.

थेट मुख्यमंत्र्यांशी पंगा घेतल्याने मंत्रिपद गमावलेले एकनाथ खडसे विधानसभा येताच पुन्हा चर्चेचा विषय झाले. त्यांनी उमेदवारीच्या घोषणेची वाट न बघता परस्पर मुक्ताईनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपच्या पहिल्या यादीच खरंच खडसेंचं नाव नाही. त्यावर मुहुर्त चुकू नये म्हणून आपण डमी अर्ज भरल्याची सारवासारव खडसेंनी केली आहे.

दरम्यान, पहिल्या यादीत खडसेंचं नाव वगळल्याचं लक्षात येताच खडसे समर्थक आक्रमक झाले. त्यांनी खडसेंच्या घरासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. एवढंच नाहीतर या अन्यायाविरोधात थेट राजीनामा देण्याची गळ देखील खडसेंना घातली. पण खडसे अजूनही तिकीट मिळेल या आशेवर आहेत.

भाजपमध्ये एका बाजूला नव्याने डेरेदाखल झालेल्यांना भाजपने संधी देत 12 जणांचा पत्ता आधीच कट केला आहे. एकनाथ खडसेंना भाजप उमेदवारी देईल अशी आशा आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार भाजप हायकमांड खडसेंना नाहीतर त्यांच्या मुलीला तिकीट द्यायचं आहे. त्यामुळे भाजपने खरंच नाथाभाऊंचा पत्ता कट केला तर ते बंडखोरी करणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 2, 2019, 7:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading