भाजप आमदाराने भेट घेतल्याच्या बातमीने खळबळ, शरद पवार म्हणाले...

भाजप आमदाराने भेट घेतल्याच्या बातमीने खळबळ, शरद पवार म्हणाले...

भाजपच्या आमदाराने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याच्या बातमीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. परंतु, शरद पवार यांनी...

  • Share this:

पुणे, 16 नोव्हेंबर : सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकीकडे चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे पुण्यात आज भाजपच्या आमदाराने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, शरद पवारांनी अशी कोणतीही भेट झाली नाही, असा खुलासा केला.

शरद पवार हे आज कौटुंबिक कार्यक्रमासाठी आज दिवसभर पुण्यात होते. शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या मोदीबाग सोसायटीमध्ये भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी हजेरी लावली.

शरद पवार हे मोदी बागेतच होते. त्यामुळे जयकुमार गोरेंनी पवारांची भेट घेत असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. परंतु, जयकुमार गोरे हे मला भेटायला आलेच नाही आणि अशी कोणतीही भेट झाली नाही, असं सांगत शरद पवारांनी खंडन केलं. दरम्यान, एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारांशी बोलताना जयकुमार गोरे यांनी शरद पवार हे मोदी बागेत राहतात हे मला माहिती नाही. मी खासगी कामासाठी गेलो होतो, असा खुलासा गोरे यांनी केला. जयकुमार गोरे हे माण-खटावमधील भाजपचे आमदार आहेत.

दरम्यान, शपथविधीच्या तारखेबाबतही शरद पवारांनी बोलणं टाळलंय. जेव्हा पत्रकारांनी तेव्हा शपथविधीबद्दल विचारले असता, याबद्दल राजभवनावरून सुचना येईल, असं वक्तव्य पवारांनी केलं.

शरद पवार आणि सोनिया गांधींची बैठक?

दरम्यान, राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही नवी आघाडी उदयास येण्याच्या मार्गावर आहे. त्या दिशेनं या प्रमुख पक्षांनी पावलं टाकण्यास सुरूवात केली आहे.  आता सर्व लक्ष दिल्लीत सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या बैठकीकडं लागलं आहे. रविवारी दिल्लीत या दोन नेत्यांमध्ये महत्वाची बैठक होवू घातली आहे.

शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्यापूर्वी किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्याचा आग्रह दोन्ही काँग्रेसनं धरला होता. त्यासाठी खास दिल्लीहून काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटले आणि मल्लिकार्जून खरगे मुंबईत आले होते. त्यानंतर या नव्या राजकीय समीकरणाला वेग आला. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार केला.

रविवारी दिल्लीत  सोनिया गांधी आणि शरद पवारांमध्ये होणाऱ्या बैठकीत या मसुद्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किमान समान कार्यक्रमावर

पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केल्यानंतरचं सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नव्या आघाडीची गाडी पुढे जाणार आहे. त्यामुळे दिल्लीतील बैठकीकडं काँग्रेस-राष्ट्रवादीसह  शिवसेनेच्या नेत्यांचे डोळे लागून राहिले आहेत.

=========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2019 07:33 PM IST

ताज्या बातम्या