अद्वैत मेहता(प्रतिनिधी) पुणे, 15 सप्टेंबर: भाजपची महाजनादेश यात्रा शनिवारी पुण्यात होती. यावेळी शहरात भर रस्त्यावरच अनेक अनधिकृत होर्डिंग्ज उभी करण्यात आली होती. यामुळं पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागला. वाहतूक कोंडीतून मार्ग काढत जाणाऱ्या अँब्युलन्सला या होर्डिंग्जच्या अडथळ्याला सामोरं जावं लागलं. याचा व्हिडिओ एका जागरूक नागरिकानं काढला आहे.