SPECIAL REPORT: भाजपकडून गणेश नाईक यांची कोंडी; वडिलांसाठी अखेर मुलाची माघार

SPECIAL REPORT: भाजपकडून गणेश नाईक यांची कोंडी; वडिलांसाठी अखेर मुलाची माघार

भाजपकडून ऐरोली मतदारसंघातून संदीप नाईक यांच्याऐवजी गणेश नाईक यांना उमेदवारी.

  • Share this:

विनय म्हात्रे (प्रतिनिधी)नवी मुंबई, 03 ऑक्टोबर: राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही असं म्हटल जातं, आणि त्याचं प्रत्यंतर  नवी मुंबईच्या राजकारणात पाहायला मिळालं. नवी मुंबईत केवळ एकचं तिकीट मिळाल्यामुळं संदीप नाईक यांनी वडिलांसाठी एक पाऊल मागे घेतलं आहे. आता ऐरोली मतदारसंघातून संदीप नाईक यांच्याऐवजी गणेश नाईक  निवडणुक लढवणार आहेत.

ऐरोली विधानसभा मतदारसंघातून भाजपनं संदीप नाईक यांच्याऐवजी गणेश नाईक यांना तिकीट दिलं. काल परवापर्यंत संदीप नाईक  ऐरोलीतून निवडणुक लढवणार असल्याच्या चर्चा होत असताना मात्र भाजपनं गणेश नाईकांच्या बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रेंना ऐनवेळी उमेदवारी जाहीर केली.त्यामुळं गणेश नाईकांची चांगलीचं कोंडी झाली.

या घडामोडींच्या पार्श्वभूमिवर बुधवारी सकाळी गणेश नाईक यांनी आपल्या 56 नगरसेवकांची तातडीची बैठक घेतली. त्यावेळी नाईक कोणती भूमिका घेतात याविषयी प्रचंड उत्सूकता निर्माण झाली होती. पण संदीप नाईक यांनी वडिलांसाठी एक पाऊल मागे घेत ऐरोलीवरचा दावा सोडला.

एका रात्रीत नवी मुंबईतील सगळं चित्रचं बदलून गेलं. खरं तर नाईक पिता-पुत्रांच्या भाजप प्रवेशानंतर ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघातून  नाईक कुटुंबीयांना उमेदवारी  मिळेल अशी त्यांच्या  समर्थकांना आशा होती. बेलापूरातील विद्यमान भाजप आमदार मंदा म्हात्रेंना तसे संकेतही भाजपकडून देण्यात आले होते. मात्र ऐनवेळी भाजपनं गणेश नाईकांना धक्का दिला.राष्ट्रवादीत असताना महपालिकेपासून लोकसभेपर्यंत कुटुंबासाठी तिकीट मिळवणाऱ्या गणेश नाईकांना एका जागेवर समाधान मानण्याची वेळ आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2019 06:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading