• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ऊसाच्या फडातून थेट विधानसभेत...कसा आहे राम सातपुतेंचा प्रवास
  • VIDEO : ऊसाच्या फडातून थेट विधानसभेत...कसा आहे राम सातपुतेंचा प्रवास

    News18 Lokmat | Published On: Oct 25, 2019 11:42 AM IST | Updated On: Oct 25, 2019 11:45 AM IST

    बीड, 25 ऑक्टोबर: माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राम सातपुते विजयी झालेत. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या राम सातपुतेंनी 2702 मतांधिक्यानं विजय मिळवला.माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी ह्या कायम दुष्काळी गावात राम सातपुते यांचे लहानपण गेले. हा विश्वास सार्थ ठरवत सातपुतेंनी विजय मिळवला. भांबुर्डी गावातील ऊसतोड कामगाराचा मुलगा असलेल्या राम सातपुतेंना भाजपनं तिकीट दिलं होतं. मोहिते पाटील यांचं वर्चस्व असलेल्या मतदारसंघात भाजपने उच्च शिक्षित राम सातपुते यांना संधी दिली. ज्या आई वडिलांनी माळशिरस तालुक्यात ऊस तोडला. त्याच माळशिरसचा आमदार होण्याचं भाग्य तरूण राम सातपुते यांना मिळाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading