बीडमध्ये काका-पुतण्यामधील संघर्ष टोकाला, एकमेकांनी केली चारित्र्यावर टीका

बीडमध्ये काका-पुतण्यामधील संघर्ष टोकाला, एकमेकांनी केली चारित्र्यावर टीका

विधानसभा निवडणुकीसाठी बीडमध्ये क्षीरसागर काका पुतण्या आमनेसामने

  • Share this:

सुरेश जाधव (प्रतिनिधी) बीड , 06 ऑक्टोबर:महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्याचा राजकीय संघर्ष तसा नवा नाहीये. पण बीडमधील क्षीरसागर काका-पुतणे मात्र, आत्तापासूनच परस्परांचे वस्त्रहरण करून करू लागलेत. काका जयदत्त क्षीरसागर यांनी पुतण्या संदीपवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात पुतण्याने थेट काकांच्या जुन्या भ्रष्टाचाराची कुंडलीच बाहेर काढण्याची धमकी देऊन टाकली आहे. बीडमधील क्षीरसागर काका पुतण्याची राजकीय लढाई आता थेट चारित्र्यावर येऊन ठेपली आहे.

काकाने पुतण्याच्या चात्रिऱ्यावर बोट ठेवताच पुतण्याने थेट काकाविरोधात थेट फॉरेन्सिक पुरावाच सादर करण्याचा गर्भित इशारा देऊन टाकला. हे काका पुतणे एकमेकांचे भ्रष्टाचारच काढून थांबले नाहीत तर त्यांनी आता एकमेकांच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवायला सुरूवात केली. पुतण्या संदीपने काका जयदत्त क्षीरसागरांना गर्भित इशारा दिली आहे.

राष्ट्रवादीने पुतण्याला हवा देताच जयदत्त क्षीरसागरांनी शिवसेनेत उडी मारून मंत्रीपदही मिळवलं. आता हेच दोन्ही काका-पुतणे बीडच्या राजकीय आखाड्यात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. त्यामुळे हा विधानसभेपर्यंत यांच्यातील संघर्ष किती शिगेला जातो आणि या निवडणुकीच्या मैदानात कोण बाजी मारणार हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2019 08:12 AM IST

ताज्या बातम्या