SPECIAL REPORT:बीडमधील पंकजा मुंडेंच्या प्रचाराचा नारळ अमित शाह फोडणार

SPECIAL REPORT:बीडमधील पंकजा मुंडेंच्या  प्रचाराचा नारळ अमित शाह फोडणार

दसरा मेळाव्याला भगवान गडावर भाजप अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाहांची उपस्थित राहणार.

  • Share this:

बीड, 03 ऑक्टोबर: सावरगावातील भगवान भक्ती गडावर दसऱ्याच्या दिवशी भव्य मेळाव्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यावर्षी गडावर देशाचे गृहमंत्री अमित शहा स्वतः उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला लाखो भाविक जमतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भगवान भक्तीगड, भगवान गडाच्या वादानंतर भगवान बाबांच्या जन्मभूमीत साकारलेल्या भगवान भक्तीगडावरून शक्तीप्रदर्शन करण्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे सज्ज झाल्या आहेत. यावेळच्या दसरा मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे भाजपाध्यक्ष अमित शाहांच्या उपस्थितीत हा दसरा मेळावा पार पडणार आहे.

भगवान गडावरच्या दसरा मेळाव्याची गोपीनाथ मुंडेंनी सुरवात केली होती. ही परंपरा महंत नामदेव शास्त्रींच्या तीव्र विरोधामुळे  खंडित झाली. त्यावर मोठा तोडगा काढत पंकजा मुंडेंनी भगवान बाबांच्या जन्मभूमीत दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली. भक्ती आणि शक्तीचा संगम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दरसा मेळाव्याची जागा बदलली. पण मेळाव्याला होणारी गर्दी कमी झाली नाही हे दिसून आलं. राज्यातील महत्वाच्या तीन मेळाव्यांपैकी एक असलेल्या हा मेळावा ऐन निवडणुकीच्या तोंडावर होत आहे. त्यात पक्षाध्यक्ष अमित शाहांच्यासमोर लाखो समर्थकांच्या मेळाव्यातून पंकजा मुंडेंचा शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न असेल हे नक्की. बीडमध्ये पंंकज मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे यांच्यातील लढत अटीतटीची असल्यानं त्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. बीडमधील निवडणुकीच्या मैदानात कोण बाजी मारणार हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 3, 2019, 8:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading