रत्नागिरी, 21 सप्टेंबर: युतीच्या पोपटाची अवस्था फार वाईट आहे. वाघ 144 जागांसाठी डरकाळी फोडतोय पण भाजपवाले, आम्ही देतोय तेवढा तुकडा फेकलाय तेवढा तुकडा घ्या' अशा शब्दात राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेवर घणाघात केला आहे. गुहागरमध्ये शिवस्वराज्य यात्रेदरम्यान डॉ. कोल्हेंनी शिवसेनेवर तोफ डागली आहे.