मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता; असा चेक करा रिझल्ट

सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता; असा चेक करा रिझल्ट

सूत्रांच्या माहितीनुसार निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 14 जुलै: कोरोनामुळे (Corona) रद्द झालेल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा (Maharashtra state SSC Board) दहावीचा आणि बारावीचा निकाल जुलै महिन्यात लागणार असे संकेत राज्य शासनाकडून (Maharashtra government) देण्यात आले होते. त्यानुसार आता स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल (MH board 10th result date) उद्या लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्या म्हणजेच 15 जुलै 2021 ला दहावीचा निकाल जागीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड हायर सेकेंडरी एजुकेशन (MSBSHSE) कडून याबाबत अजून कुठल्याही प्रकारची घासीहून करण्यात आलेली नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यांनी काही दिवसांपूर्वी दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर होणार असे संकेत दिले होते. त्यानुसार आता ही शक्यता वर्तवण्यात येत आहे. दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी राज्यात CET परीक्षाही घेण्यात येणार आहे. त्यामुळे दहावीचा निकाल लवकरात लवकर लागण्याची गरज आहे.

असं होणार मूल्यांकन

यावर्षी राज्य शिक्षण विभागाने निकालाच्या गणितासाठी पर्यायी मूल्यांकन निकष लावले आहेत. महाराष्ट्र वर्ग दहावीच्या मूल्यांकन निकषानुसार, वर्ग 9 ची वार्षिक परीक्षा आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यांकन, युनिट टेस्ट आणि प्री-बोर्ड मधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे निकाल मोजला जाईल.

असा चेक करा Result

महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी, maharashtraeducation.com किंवा mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

होम पेजवरील महाराष्ट्र इयत्ता दहावीच्या निकाल 2021च्या लिंकवर क्लिक करा.

यानंतर एक नवीन window ओपन होईल.

इथे तुमचे क्रेडेन्शियल्स टाईप करा आणि लॉग इन करा.

यानंतर तुमचा दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

हा निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी निकालाचं प्रिंटआउट घ्या.

दहावीच्या निकालाबाबत अजूनही अधीकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र महाराष्ट्र SSC RESULT 2021 ची अधिकृत तारीख आणि वेळ लवकरच राज्य सरकारकडून जाहीर करण्यात येईल.

First published:

Tags: 10th class, Exam result, Ssc board