Home /News /maharashtra /

ST employees Strike: दोन दिवसांत 2 एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या; संपावर तोडगा कधी?

ST employees Strike: दोन दिवसांत 2 एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या; संपावर तोडगा कधी?

दोन दिवसांत 2 एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या; संपावर तोडगा कधी?

दोन दिवसांत 2 एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या; संपावर तोडगा कधी?

ST employees strike updates: एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरू आहे. त्यातच न्यायालयातही तारीख पे तारीख मिळत आहे. संपावर तोडगा निघत नसल्याने संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच आर्थिक विवंचनेतून कर्मचारी टोकाचं पाऊल उचलत आहेत.

पुढे वाचा ...
मुंबई, 27 फेब्रुवारी : एसटी अर्थातच राज्य परिवहन महामंडळाच्या (Maharashtra State Road Transport Corporation) कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संप (ST employees strike) पुकारला. या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडूनही (Maharashtra Government) अनेक प्रयत्न झाले. त्यानंतर काही कर्मचारी कामावर रुजू सुद्धा झाले मात्र, अद्यापही अनेक कर्मचारी हे संपावर ठाम आहेत. गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी संपावर तोडगा निघत नाहीये आणि परिणामी कर्मचाऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचाही (financial crises) आता सामना करावा लागत आहे. त्यातच एसटी कर्मचारी टोकाचं पाऊल उचलत आहेत. (ST employees strike continues, 2 workers commits suicide within 2 days) दोन दिवसांत दोन कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या गेल्या दोन दिवसांत एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. दोन दिवसांत दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. उस्मानाबाद येथील वाहक हनुमंत अकोसकर आणि पिंपरी चिंचवड येथील चालक संजय सरोदे यांनी आत्महत्या केली आहे. वाचा : "एसटीच्या विलिनीकरणाचा अहवाल जाहीर करता येणार नाही", राज्य सरकारची न्यायालयात माहिती उस्मानाबाद येथील एसटीचे वाहक हनुमंत चंद्रकांत अकोसकर यांनी शुक्रवारी (25 फेब्रुवारी) रात्री विषारी औषध प्राशन करून राहत्या घरी आत्महत्या केली. शुक्रवारीच एसटी महामंडळचं राज्य शासनात विलगीकरण होणार की नाही याबाबतची कोर्टात सुनावणी झाली पण न्यायालयाने पुन्हा नवी तारीख दिल्याने अकोसकर हे हताश झाले होते. त्यानंतर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असं बोललं जात आहे. हनुमंत चंद्रकांत अकोसकर यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी आणि आई वडील आहेत. त्यांच्या या निर्णयाने घरावर व एसटी कर्मचारी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वाचा : शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; 1800 उमेदवार बोगस, बिहारमध्ये पेपर फोडण्याचे प्रशिक्षण उस्मानाबाद येथील वाहक हनुमंत अकोसकर यांच्या मृत्यू नंतर एसटी कर्मचारी संतप्त झाले आणि त्यांचा मृतदेह उस्मानाबाद येथील बस आगरात उपोषणस्थळी आणल्याने तणावाचे व भावुक वातावरण निर्माण झाले होते. सरकार व प्रशासन चा भावनाशून्य ? कारभार पाहायला मिळत असून जाग कधी येणार हा प्रश्न विचारला जात आहे. तर काल (26 फेब्रुवारी 2022) पिंपरी चिंचवड येथील आगारात कार्यरत असलेले एसटी चालक संजय सरोदे यांनी टोकाचं पाऊल उचललं. संजय सरोदे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. मात्र, संजय सरोदे यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. एसटी संपामुळेच नैराश्येत त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Maharashtra, Osmanabad, ST, St bus, Strike

पुढील बातम्या