मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

SSC Result 2021: विद्यार्थ्यांनो, कसा आणि कुठे दिसेल निकाल? आताच जाणून घ्या

SSC Result 2021: विद्यार्थ्यांनो, कसा आणि कुठे दिसेल निकाल? आताच जाणून घ्या

आम्ही तुम्हाला निकाल कुठे आणि कसा बघावा याबद्दल माहिती देणार आहोत.

आम्ही तुम्हाला निकाल कुठे आणि कसा बघावा याबद्दल माहिती देणार आहोत.

आम्ही तुम्हाला निकाल कुठे आणि कसा बघावा याबद्दल माहिती देणार आहोत.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 15 जुलै: उद्या म्हणजेच 16 जुलैला दहावीचा निकाल (Maharashtra SSC Results 2021) लागणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. मात्र आता हा निकाल कसा आणि कुठे बघणार याबद्दल काही विद्यार्थ्यांना माहिती नाहीये. म्हणूनच आम्ही तुम्हाला निकाल कुठे आणि कसा बघावा याबद्दल माहिती देणार आहोत. कालपासून सोशल मीडियावर आज दहावी निकाल (SSC Result) लागणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर आज सकाळी शालेय शिक्षण मंत्रालयानं यावर स्पष्टिकरण देत तसंच दहावी निकाल याबाबत पूर्व कल्पना याची माहिती अधिकृत कळवण्यात येईल, असंही स्पष्ट केलं होतं. मात्र आता स्वतः वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे आणि निकालाची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. कधी लागणार निकाल उद्या दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. विशेष म्हणजे यावेळी कोरोनामुळे दहावीचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार आहे. हे वाचा - Big Breaking News: उद्या लागणार दहावीचा निकाल, असा चेक करा निकाल या वेबसाईट्सवर चेक करा रिझल्ट maharashtraeducation.com mahresult.nic.in sscresult.mkcl.org असा तपासा तुमचा निकाल अधिकृत महाराष्ट्र निकाल वेबसाइटला भेट द्या. मुख्यपृष्ठावरील महाराष्ट्र इयत्ता 10 च्या निकालाच्या 2021 च्या लिंकवर क्लिक करा. आपणास एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल. आपली क्रेडेन्शियल्स टाइप करा आणि लॉग इन करा. आपला एसएससी निकाल आपल्या स्क्रीनवर दिसून येईल. संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउट डाउनलोड करा.
First published:

पुढील बातम्या