Home /News /maharashtra /

महाराष्ट्राच्या जवानाचं मध्य प्रदेशात अपघाती निधन, 4 वर्षांच्या मुलाचं पितृछत्र हरपलं

महाराष्ट्राच्या जवानाचं मध्य प्रदेशात अपघाती निधन, 4 वर्षांच्या मुलाचं पितृछत्र हरपलं

सैन्यात काम करणाऱ्या जवानाचे मध्यप्रदेशमधील सागर शहरात अपघाती निधन झाल्याची घटना घडली आहे.

    रत्नागिरी, 24 फेब्रुवारी : चिपळूण तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील विशाल रघुनाथ कडव या सैन्यात काम करणाऱ्या जवानाचे मध्यप्रदेशमधील सागर शहरात अपघाती निधन झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी(उद्या) सकाळी साडेदहा वाजता त्यांच्यावर पिंपरी खुर्द येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विशाल रघुनाथ कडव हे पत्नी आणि आणि चार वर्षांचा मुलगा शिव यांच्यासह ते आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी राहत होते. बारावीपर्यंत शिक्षण हे चिंचघरी येथील हायस्कूलमध्ये झाल्यानंतर ते 15 मराठा बटालियनमध्ये दाखल झाले. गेली 13 वर्षे ते देशसेवेत होते. 9 वर्षं जम्मू काश्मीरमध्ये काढल्यानंतर आता ते भोपाळमध्ये कार्यरत होते. आई, वडील, तीन बहिणीसह पत्नी, मुलगा असा परिवार आहे. वडील आजारी असल्याने सोमवारी दुपारपर्यंत घरी विशाल यांच्या निधनाचे वृत्त आई-वडिलांना कळवण्यात आले नव्हते. त्यांच्या निधनाने चिपळूण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Chiplun, Ratnagiri

    पुढील बातम्या