• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • महाराष्ट्रातील धावपटूचा हरियाणात मृत्यू, स्पर्धेदरम्यान मैदानात धावताना कोसळला Bandu Waghmode

महाराष्ट्रातील धावपटूचा हरियाणात मृत्यू, स्पर्धेदरम्यान मैदानात धावताना कोसळला Bandu Waghmode

हरियाणात स्पर्धा सुरू असताना कोसळल्याने धावपटू बंडू वाघमोडेचा मृत्यू

हरियाणात स्पर्धा सुरू असताना कोसळल्याने धावपटू बंडू वाघमोडेचा मृत्यू

Maharashtra runner bandu waghmode died in Haryana: महाराष्ट्रातील धावपटू बंडू वाघमोडे याचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:
पंढरपूर, 22 सप्टेंबर : क्रीडा क्षेत्रातून एक धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील धावपटू बंडू वाघमोडे (Runner Bandu Waghmode) याचा हरियाणात (Haryana) मृत्यू झाला आहे. स्पर्धा सुरू असताना बंडू वाघमोडे हा मैदानात कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या वृत्ताने संपूर्ण सोलापूर (Solapur) जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. धावपटू बंडू वाघमोडे हा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील निवासी होता. हरियाणातील रोहतक येथे आंतरराज्य मैदानी स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बंडू वाघमोडे हा हरियाणात गेला होता. बंडू वाघमोडे हा महाविद्यालयात शिक्षण घेत होता आणि तो अवघ्या 21 वर्षांचा होता. मिळालेल्या माहितीनुसार, बंडू वाघमोडे हा ग्रामीण भागातील असून त्याचे वडील हे मेंढपाळ आहेत. बंडू हा महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता आणि त्यासोबतच इतरही कामे करुन आपल्या कुटुंबाचं उदर्निर्वाह करण्यासाठी वडिलांना हातभार लावत होता. बंडू याला सैन्य दल किंवा पोलीस दलात जाण्याची इच्छा होती. मात्र, काळाने घात केला. IPL 2021: 'या' कारणामुळे चेन्नईविरुद्ध खेळला नाही रोहित, मोठ्या नियोजनाचा आहे भाग मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बंडू वाघमोडे हा स्पर्धेत धावत असताना अचानक मैदानात कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. बंडू वाघमोडे याच्या मृत्युचं नेमकं कारण काय आहे हे समजू शकलेलं नाहीये. बंडू वाघमोडे याचे पार्थिव लवकरच सोलापूर येथे आणण्यात येणार आहे. नागपुरात मैदानात सराव करताना दोन खेळाडूंचा मृत्यू दहा दिवसांपूर्वी नागपुरात दोन खेळाडूंचा वीज कोसळून मृत्यू झाला होता. वीजांचा कडकडाट झाला. वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. नागपुरातील चनकापूर येथील मैदानात ही घटना घडली. या घटनेने संपूर्ण नागपुरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नागपुरातील चनकापूर येथे असलेल्या मैदानात नेहमीप्रमाणे तरुण क्रिकेट आणि फुटबॉलचा सराव करण्यासाठी येत असतात. शुक्रवारी सुद्धा अशाच प्रकारे सर्व मुले मैदानात सराव करत होते आणि त्याच दरम्यान वीज कोसळली. या दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जखमी झाला. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तन्मय दहीकर आणि अनुज कुशवाह या दोघांवर वीज कोसळली. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. तर सक्षम हा गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले अन् मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.
Published by:Sunil Desale
First published: