सोलापुरात शिवशाही एसटीचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू, 11 जण गंभीर जखमी

सोलापुरात शिवशाही एसटीचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू, 11 जण गंभीर जखमी

पुण्याहून सोलापूरच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या शिवशाही एसटी बसचा अपघात झाला.

  • Share this:

सोलापूर, 30 ऑगस्ट : पुण्याहून सोलापूरच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या शिवशाही एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शेटफळ गावाजवळील ही दुर्घटना आहे. जखमींना जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृत्युमुखी पडलेली व्यक्ती माजी सैनिक असल्याची माहिती समोर आली आहे. अपघात झाला त्याक्षणी एसटीमध्ये एकूण 16 प्रवासी होते.

(वाचा :पतीसोबत झालं भांडण, रागाच्या भरात 5 महिन्यांच्या गर्भवतीनं इमारतीवरून मारली उडी)

शिवशाही बसला मागून येणाऱ्या ट्रकची जोरदार टक्कर झाल्यानं हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एसटी पूर्णतः चुराडा झाला आहे. दरम्यान या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

(वाचा :इमारतीवरून उडी मारून तरुणीची आत्महत्या,बॉलिवूडमध्ये करायचं होतं करिअर; पण...)

VIDEO : बीडमध्ये राजकारण तापलं, पंकजा मुंडेंची अजित पवारांवर जहरी टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 11:31 AM IST

ताज्या बातम्या