मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिवशाही बसला भीषण अपघात; तब्बल 38 जण जखमी, 17 गंभीर

शिवशाही बसला भीषण अपघात; तब्बल 38 जण जखमी, 17 गंभीर

या अपघातात 38 जण जखमी झाले आहेत. जखमी असलेले बहुतांश प्रवासी हे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

या अपघातात 38 जण जखमी झाले आहेत. जखमी असलेले बहुतांश प्रवासी हे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

या अपघातात 38 जण जखमी झाले आहेत. जखमी असलेले बहुतांश प्रवासी हे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

नांदेड, 14 फेब्रुवारी : महाराष्ट्राच्या शिवशाही बसला तेलंगणा राज्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 38 जण जखमी झाले आहेत. जखमी असलेले बहुतांश प्रवासी हे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

नांदेडहून हैदराबादकडे जाणाऱ्या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी होऊन हा अपघात झाला. तेलंगणा राज्यातील कामारेड्डी जिल्ह्यात झालेल्या या अपघातातील सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. 

नेमकं काय घडलं?

नांदेड आगाराची शिवशाही बस क्रमांक एम एच 06 बी डब्ल्यू 4413 ही 13 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता नांदेड - हैदराबाद फेरीवर धावत असताना 14 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजता कामारेड्डी (तेलंगणा राज्य) च्या अलीकडे सदर बस रस्त्याच्या खाली उतरली आणि 2 ते 3 पलट्या घेतल्याने अपघात झाला.

हेही वाचा - प्रेयसीसोबत पळालेल्या 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

अपघाताच्या वेळी चालक, वाहक आणि इतर 36 प्रवासी बसमध्ये होते. सदर अपघातात 17 प्रवाशांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. अपघातात शिवशाही बसच्या चालकाच्या डोक्याला मार लागला असून वाहकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. विजयकुमार वाघवसे आणि अब्दुल करीम अशी चालक आणि वाहकाची नावे आहेत. सर्व जखमी प्रवाशांना कामारेड्डी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, प्रथम दर्शनी सदर अपघात बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झाल्याचं दिसून येत आहे. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

First published:
top videos