शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम, मातोश्रीवर बैठकीतल्या 10 मोठ्या गोष्टी

शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम, मातोश्रीवर बैठकीतल्या 10 मोठ्या गोष्टी

फड़णवीसांच्या रुपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं असलं तरी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेनं त्यांची 50-50 फॉर्म्युल्यावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 07 नोव्हेंबर : राज्यातील सत्ता स्थापनेसाठी वेगवान हालचाली सुरु झाल्या असून गुरुवारी सकाळपासून बैठकांना जोर आला आहे. भाजप शिवसेना यांच्यातील तणाव दूर होईल आणि युतीचे सरकार स्थापन होण्याची आशा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित आमदारांशी चर्चा केली. शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांना मोबाइल बंदी आणि निष्ठेची शपथ देण्यात आली असल्याचं समजते. विधानसभा निवडणुकीनंतर आक्रमक झालेली शिवसेना अजूनही शांत झालेली नाही.

मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असं शिवसेना नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे. बहुमतासाठी लागणाऱ्या 144 जागांपासून भाजप मागील निवडणुकीच्या तुलनेत जास्तच दूर राहिल्याने शिवसेनेनं संधी साधली आहे. मात्र भाजपला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेला त्यांचे आमदार फुटण्याची भीती सतावत असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मातोश्रीवर बैठकीतील 10 महत्त्वाचे मुद्दे

-मुख्यमंत्रिपदावर शिवसेनेची ठाम भूमिका

-लोकसभेवेळी जे ठरलं त्या प्रमाणे व्हावं

-सर्व आमदारांना मुंबईत राहण्याचे आदेश

-शिवसेनेच्या आमदांरांची भूमिका, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर भाजपला पाठिंबा देऊ

-मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, आमदारांची भूमिका

-शिवसेनेचे सर्व आमदार एकत्र राहणार

-आमचे आमदार कोणी फोडू शकत नाही

-सेना आमदार बैठकीनंतर रंगशारदा हॉटलमध्ये दाखल

-शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम, अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील

-उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील सर्वांना मान्य

वाचा : ..तर त्या बाटग्यांना जनता सोडणार नाही, सामनाच्या अग्रलेखातून सेनेचा इशारा

निवडणुकीचे निकाल 24 ऑक्टोबरला लागले. त्यामध्ये कोणत्याच एका पक्षाला बहुमत मिळालं नाही. 288 जागापैकी भाजप 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी 54, काँग्रेसने 44 आणि इतर पक्ष आणि अपक्षांनी 28 जागा जिंकल्या. सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला 145 चा बहुमताचा आकडा भाजप-सेना युतीने गाठला. मात्र त्यांच्यात सत्तेच्या वाटपावरून तणाव निर्माण झाला आहे.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नांगरे पाटलांनी घेतली बैठक, म्हणाले...

First published: November 7, 2019, 1:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading