महाराष्ट्र पुन्हा हादरला! कोरोनामुळे पहिल्या महिला पोलिसाचा मृत्यू, ठाणे शहरात होत्या तैनात

महाराष्ट्र पुन्हा हादरला! कोरोनामुळे पहिल्या महिला पोलिसाचा मृत्यू, ठाणे शहरात होत्या तैनात

आज सकाळी मुंबई-पुण्यातील तीन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातही ही धक्कादायक बाब समोर आली आहे

  • Share this:

मुंबई, 21 मे : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. महाराष्ट्रात तर दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. त्यात आज पुण्यातील पोलीस जवानाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. त्यानंतर आज पुन्हा असाच धक्का बसला आहे. श्रीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई श्रीमती प्रतिभा गवळी (45) यांचे कोरोनाशी झुंज देताना दुःखद निधन झाले आहे. ठाणे शहर पोलिसांनी याबाबत दु:ख व्यक्त केलं आहे.

प्रतिभा गवळी या महिला पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. त्या ठाणे शहरात तैनात होत्या. पहिल्या महिला पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आधीच राज्यातील कोरोना योद्धांना कोरोनाची लागण होत असल्याची प्रकरणं समोर येत होती. त्यातच आता कोरोनामुळे त्यांचा मृत्यू होत असल्याने सर्वांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

महाराष्ट्रात अक्षरश: थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे एकाच दिवशी तीन पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मृत पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये एक पुणे येथील तर दोन मुंबईतील आहेत. मुंबई पोलिसामधील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भिवसेन हरिभाऊ पिंगळे यांचा कोरोना आजारामुळे मृत्यू झाला आहे. तसेच मुंबईतील पार्कसाइट पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेले हेड कान्स्टेबल गणेश चौधरी (वय-57) यांची कोरोनामुळे मृत्यू झाला. दोन्ही अधिकारी 'हाय-रिस्क एज-ग्रुप'मध्ये होते. त्यामुळे दोघे एप्रिलपासून रजेवर होते.

हे वाचा -रोजा सोडण्यासाठी जेवण घ्यायला जाताना भरबाजारात दहशतवाद्यांचा हल्ला, जवान शहीद

मुंबईबाबत धोका व्यक्त करत देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारबद्दल म्हणाले...

First Published: May 21, 2020 09:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading