मातृवंदना सप्ताहाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात दुसरा

मातृवंदना सप्ताहाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात दुसरा

पंतप्रधान मातृवंदना योजनेंतर्गत प्रथम प्रसव होणाऱ्या महिलांना पौष्टिक आहार मिळावा, मोल मजुरी करणाऱ्या महिलांना कामानिमित्त बाहेर जाताना आराम मिळावा, बाळाची निगा घेता यावी, यासाठी तीन हप्त्यांमध्ये एकूण 5 हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात येते.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास,(प्रतिनिधी)

नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी: पंतप्रधान मातृवंदना योजनेंतर्गत आयोजित मातृवंदना सप्ताहाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

देशभर मातृवंदना सप्ताहादरम्यान राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांची संपूर्ण माहिती केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वेबपोर्टलवर अपलोड करण्यात आली. या माहितीचे परिक्षण करून आणि प्रत्यक्ष पाहणी करून अंमलबजावणी करणा-या राज्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या मोठया राज्यांमध्ये महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर असल्याचे डॉ. देशपांडे यांनी सांगितले. पंतप्रधान मातृवंदना योजनेंतर्गत प्रथम प्रसव होणाऱ्या महिलांना पौष्टिक आहार मिळावा, मोल मजुरी करणाऱ्या महिलांना कामानिमित्त बाहेर जाताना आराम मिळावा, बाळाची निगा घेता यावी, यासाठी तीन हप्त्यांमध्ये एकूण 5 हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेकरता केंद्राकडून 60 टक्के तर राज्याकडून 40 टक्केंचा निधी पुरवण्यात येतो.

केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयावतीने येथील हॉटेल अशोकमध्ये आयोजित कार्यक्रमात मंत्रालयाच्या पंतप्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीसह मातृवंदना सप्ताहाची उत्कृष्ट अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पंतप्रधान मातृवंदना योजनेंतर्गत 2 ते 8 डिसेंबर 2019 दरम्यान देशभर मातृवंदना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहाची उत्कृष्ट अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांना यावेळी मोठे व छोटे राज्य अशा दोन श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. मोठया राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकावला असून पुणे स्थित राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाचे सहायक संचालक डॉ. अनिरुध्द देशपांडे आणि सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

First published: February 4, 2020, 3:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading