साताऱ्यात राजे अडचणीत? पाहा EXIT POLL चा निकाल

साताऱ्यात दोन्ही राजेंनी भाजपमध्ये राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला होता. त्यामुळे इथली निवडणूक राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2019 08:35 PM IST

साताऱ्यात राजे अडचणीत? पाहा EXIT POLL चा निकाल

मुंबई, 21 ऑक्टोबर : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले. या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येईल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला जात आहे. News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळण्याचा अंदात EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 41 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो. News18 Lokmat च्या exit poll मध्ये पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला होता. यामध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यातील दोन्ही राजेंनी भाजप प्रवेश केला होता. यात शिवेंद्रसिह हे विधानसभा निवडणूक लढवत होते. तर उदयनराजे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून खासदार झाले होते. त्यांनी राजीनामा दिल्यानं इथं लोकसभेची पोटनिवडणूक झाली. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली होती.

अखेरच्या टप्प्यात शरद पवार यांची साताऱ्यातील सभा वादळी ठरली होती. लोकसभेला चुक केली आता ती सुधारत आहे असं म्हणत शरद पवार यांनी भावनिक साद घातली होती. विधानसभेसाठी शिवेंद्रराजेंविरुद्ध राष्ट्रवादीने दीपक पवार यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला असला तरी साताऱ्यातील जनता राजघराण्याच्या पाठिशी राहिल्याने काँग्रेस राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक जड जाणार होती. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत या जागेवर अटीतटीची लढत झाल्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. त्यामुळे राजे बाजी मारणार की राष्ट्रवादी गड राखणार हे 24 तारखेलाच स्पष्ट होईल.

लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही भाजप जोरदार मुसंडी मारणार असंच चित्र यामध्ये दिसत आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला शंभरी गाठता आली नव्हती. तर आता एक्झिट पोलमध्ये आघाडीला 41 जागा मिळतील असं समोर आलं आहे. तर भाजप शिवसेना युतीला तब्बल 243 जागा मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना-भाजपला 2014 च्या तुलनेत 11 जागा जास्त मिळण्याची शक्यता आहे. यावेळी युतीला 43 तर आघाडीला 23 जागा मिळतील असं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.

एक्झिट पोलनुसार 2019 च्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात 27 जागा भाजपला तर 16 जागा शिवसेनेला मिळतील. तर आघाडीच्या जागा कमी होण्याची चिन्हे असून काँग्रेसला 7 तर राष्ट्रवादीला 15 आणि इतर एक उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात एकूण 66 विधानसभेच्या जागा असून 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेला 12, भाजपला 22, राष्ट्रवादीला 18, काँग्रेसला 10 तर रासप, शेकपा, एमएनएस आणि अपक्ष असे प्रत्येकी एक जागा जिंकली होती.

Loading...

वाचा : उत्तर महाराष्ट्रात 36 पैकी 31 जागांवर भाजप-शिवसेना महायुतीची 'आघाडी'

2014 च्या निवडणुकीत काय झालं?

2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या.

वाचा : विदर्भात महायुतीचंच वर्चस्व, News 18 लोकमत आणि IPSOS च्या सर्व्हेचा अंदाज

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावली. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

LIVE EXIT POLL : केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र; महाराष्ट्रात युती ऐतिहासिक

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागा आणि 2014 चं पक्षीय बलाबल

एकूण जागा - 288

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

घोड्यावर बसून तरुण आले मतदानाला, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 08:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...