राज्यात आज कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांची संख्या अधिक, मृतकांचा आकडाही मोठा

राज्यात आज कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांची संख्या अधिक, मृतकांचा आकडाही मोठा

Maharashtra Coronavirus news: राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सुरू असलेली वाढ अद्यापही कायम असल्याचं दिसत आहे. तसेच मृतकांचा आकडाही मोठा आहे.

  • Share this:

मुंबई, 7 मे: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या संख्येत घसरण होत असल्याचं पहायला मिळत होतं. मात्र, काल (गुरुवारी) राज्यात पुन्हा एकदा 60 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर आजही कोरोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या अधिक (Covid positive cases increase) असल्याचं आकडेवारीवरुन समोर आलं आहे. त्यामुळे राज्याची चिंता अद्यापही कायम आहे. इतकेच नाही तर मृतकांचा आकडाही मोठा असल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे.

आज राज्यात एकूण 54,022 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यात सध्या 6,54,788 सक्रिय रुग्ण झाले आहेत. तर आज 37,386 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 42,65,326 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.36 टक्के इतके झाले आहे.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण कुठल्या जिल्ह्यात?

राज्यात एकूण 6,54,788 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण 1,20,512 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर नागपूर जिल्ह्यात 61,680 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत 54,162 तर ठाणे जिल्ह्यात 45,162 सक्रिय रुग्ण आहेत.

वाचा: तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना; कोरोना विरुद्ध लढण्यासाठी राज्य सरकारने आखला खास प्लॅन

आज कुठल्या विभागात किती रुग्ण?

ठाणे मंडळ - 8335

नाशिक मंडळ - 8081

पुणे मंडळ - 13890

कोल्हापूर मंडळ - 5110

औरंगाबाद मंडळ - 2679

लातूर मंडळ - 3379

अकोला मंडळ - 4632

नागपूर मंडळ - 7916

एकूण - 54022

पाहा आज कुठल्या मनपा/जिल्ह्यात किती रुग्णांचे निदान

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ३०४० ६७११२५ ७१ १३६५१
ठाणे ६७२ ९०४७९ १३ १२१२
ठाणे मनपा ४५८ १२६२२३ १६८६
नवी मुंबई मनपा २९६ १०४१६१ १० १३९१
कल्याण डोंबवली मनपा ७२७ १३२२५१ १३११
उल्हासनगर मनपा ६४ १९५२१ ४४४
भिवंडी निजामपूर मनपा २७ १०३८८ ३९८
मीरा भाईंदर मनपा २८५ ४९८३७ १३ ८२९
पालघर ६०८ ३७७०० ३५०
१० वसईविरार मनपा ९९९ ६०३९७ ९०६
११ रायगड ८४६ ७०६०६ १३४४
१२ पनवेल मनपा ३१३ ५९७४० १३ ९२३
ठाणे मंडळ एकूण ८३३५ १४३२४२८ १४९ २४४४५
१३ नाशिक १४०० १२५३३२ १०२ १६३०
१४ नाशिक मनपा १४२३ २०८८८० ३१ १७३९
१५ मालेगाव मनपा २२ ९५२६ २१६
१६ अहमदनगर ३३५७ १३९१५९ २४ १३९०
१७ अहमदनगर मनपा ६१२ ५६९८८ १० ८२२
१८ धुळे १५८ २२४७४ २५७
१९ धुळे मनपा १२६ १७१७६ २१३
२० जळगाव ६३७ ९४७६३ १५४५
२१ जळगाव मनपा १३० ३०२३९ ४९५
२२ नंदूरबार २१६ ३६४५४ ६२५
नाशिक मंडळ एकूण ८०८१ ७४०९९१ १९८ ८९३२
२३ पुणे ४४१५ २३३७३८ ११ २६३५
२४ पुणे मनपा २६१० ४५४२७८ ५२ ५८४०
२५ पिंपरी चिंचवड मनपा १९७३ २२०३४२ १५३०
२६ सोलापूर २२४२ ९३४१० २५ १६८७
२७ सोलापूर मनपा ६५७ २९१५९ २० १२२०
२८ सातारा १९९३ ११८१८२ १६ २४२६
पुणे मंडळ एकूण १३८९० ११४९१०९ १२४ १५३३८
२९ कोल्हापूर १३५१ ५३९३९ १४४७
३० कोल्हापूर मनपा ३०९ २१७२४ ४८४
३१ सांगली १६९५ ६४३१८ १४ १४५६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३४४ २६९७६ ७५४
३३ सिंधुदुर्ग ५२२ १५६८८ ४००
३४ रत्नागिरी ८८९ २८५६६ ५६४
कोल्हापूर मंडळ एकूण ५११० २११२११ ५० ५१०५
३५ औरंगाबाद ७११ ४५६४६ २३ ५४१
३६ औरंगाबाद मनपा ३८८ ८६२४३ १५३९
३७ जालना ६८० ४९४२७ १७ ७१६
३८ हिंगोली २६२ १५२६८ २२४
३९ परभणी ५०९ २५४६२ १९ ३७३
४० परभणी मनपा १२९ १६४५३ ३०१
औरंगाबाद मंडळ एकूण २६७९ २३८४९९ ७२ ३६९४
४१ लातूर ६७६ ५८११४ १६ ८७३
४२ लातूर मनपा १९३ २१०९४ ३९९
४३ उस्मानाबाद ६४३ ४४२१९ १७ १०४१
४४ बीड १३१४ ६४९१३ ३२ १०५३
४५ नांदेड ३९८ ४२७२० ११ १०३८
४६ नांदेड मनपा १५५ ४२४०१ ७४९
लातूर मंडळ एकूण ३३७९ २७३४६१ ८५ ५१५३
४७ अकोला ३६३ १६५१६ २४०
४८ अकोला मनपा ४७० २८१४७ ४३४
४९ अमरावती ८४४ ३१२९० १८ ५७७
५० अमरावती मनपा १५३ ३८७५८ ४४७
५१ यवतमाळ ८०४ ५८४२० ११ १०६७
५२ बुलढाणा १५०६ ५७६१२ ३८४
५३ वाशिम ४९२ ३०४३० १४ ३७०
अकोला मंडळ एकूण ४६३२ २६११७३ ६८ ३५१९
५४ नागपूर १९५८ ११३३१७ १९ १३५४
५५ नागपूर मनपा २५२६ ३४३६०१ ५५ ४१५९
५६ वर्धा ८५१ ४८४९३ २० ६३६
५७ भंडारा ७४७ ५५११४ १२ ५४०
५८ गोंदिया ३५५ ३५५६० १४ ३७८
५९ चंद्रपूर ७६० ४५९७७ २१ ५३४
६० चंद्रपूर मनपा २४४ २४५२६ २८८
६१ गडचिरोली ४७५ २३१५२ २२०
नागपूर एकूण ७९१६ ६८९७४० १५२ ८१०९
इतर राज्ये /देश १४६ ११८
एकूण ५४०२२ ४९९६७५८ ८९८ ७४४१३

राज्यात आज 898 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 385 मृत्यू हे मागील 48 तासातील आहेत. तर 199 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 314 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.49 टक्के इतका झाला आहे.

Published by: Sunil Desale
First published: May 7, 2021, 9:09 PM IST

ताज्या बातम्या